
अल्पबचत योजनांचे व्याज दर घसरत असताना
म्युच्युअल फंडांमध्येही बचत खात्यासारखी वैशिष्टय़े असणारी तरल आणि सोयीस्कर पर्याय उपलब्ध केले आहेत. किंबहुना या पर्यायांनी गुंतवणूकदाराला बचत खाते आणि मुदत ठेवीच्या तुलनेत जादा परतावा दिला आहे. फंड घराण्यांकडून उपलब्ध सेव्हिंग्ज फंड योजनांनी ही किमया निश्चित साधली आहे.
व्याजाचे दर झपाटय़ाने खाली येत आहेत. अशा स्थितीत स्थिर उत्पन्न प्राप्तीसाठी म्युच्युअल फंड हा नवा पर्याय गुंतवणूकदारांनी आजमावून पाहायला हवा, असे गुंतवणूक सल्लागारांचेही मत आहे. सेव्हिंग्ज फंडांचे तज्ज्ञ निधी व्यवस्थापक संशोधनावर भर देत फंडांनी गोळा केलेला निधी कॉर्पोरेट बाँडमध्ये आणि अन्य सुरक्षित रोखे पर्यायांमध्ये गुंतवितात. कंपन्यांच्या वित्तीय कामगिरीत सुधारणेच्या शक्यतेने त्या कंपन्यांच्या रोख्यांची पतधारणाही वाढून ही गुंतवणूक फायदेशीर ठरत आहे. परिणामी यातून गुंतवणूकदारांना नियमित व सरस परतावा मिळत आहे.
मार्च २०१६ मध्ये आयसीआयसीआय प्रुडेन्शियल रेग्युलर सेव्हिंग्ज फंडात एक लाखाची गुंतवणूक करणाऱ्यांना एप्रिल २०१७ अखेर करवजावटीनंतर १ लाख २७ हजार २१९ रुपयांपर्यंत गुंतवणूक मूल्य झाले आहे. तर पारंपरिक योजनांमधून याच कालावधीत एक लाख रुपयांचे एप्रिलअखेर गुंतवणूक मूल्य १,१४,३६९ रुपये असे वाढले असते.
गेल्या काही महिन्यांत सेव्हिंग्ज फंडातील गुंतवणूक वाढली आहे. अल्पबचतीचे व्याजदर कमी होत असताना सेव्हिंग्ज फंडांच्या दमदार कामगिरीने गुंतवणूकदार सुखावला आहे.
UTI floating rate fund, ICICI pru regular saving fund यांचे व्यस्थापन तज्ञ व्यक्ती करत असल्याने त्याचा परतावा चांगलाच असतो .व बाजाराच्या चढ उताराचा यावर तसा फारसा परिणाम होत नाही.