काळाचा महिमा
तुम्ही गाडी चालवता आहात अशी कल्पना करा व तुमच्या गाडीचा वेग १० किमी/तास असा आहे आणि तुमचा मित्रसुद्धा तुमच्याच बरोबर दुसऱ्या गाडीने ११ किमी/तास वेगाने निघाला आहे.
6 मिनिटा नंतर तुम्ही आणि तुमचा मित्र यामध्ये फक्त १०० मीटरचे अंतर असेल व या अंतरात तुम्ही तुमच्या मित्राला लगेचच गाठू शकाल किंवा एकमेकांशी भेट घेवून बोलूही शकाल.
पण १ तासानंतर तुम्ही आणि तुमचा मित्र यामध्ये गाडीच्या वेगाइतका फरक पडून तुम्ही मित्रापेक्षा १ किमी मागे असू शकाल, व वाटल्यास तुम्ही मित्राला 2 ते 3 मिनिटात भेटूही शकता,
पण याच वेगाने तुमची व तुमच्या मित्राची गाडी सुरु राहिल्यास १० तासानंतर तुम्ही दोघे १० किमीच्या फरकावर असू शकता. आणि 100 तासानंतर तुमच्यात व तुमच्या मित्रात तब्बल 100 किमीचा फरक असेल व तुम्हा दोघांना एकमेकांना भेटणे, बोलणे शक्य होणार नाही, रेंज असेल तरच दूरध्वनीवरून फक्त संभाषण शक्य आहे.
याप्रमाणेच बँकेच्या फिक्स्ड डिपॉझीट मध्ये 6% दरवर्षी मिळणाऱ्या व्याजावर काही गुंतवणूक केल्यास त्यापासून मिळणारे उत्पन्न व म्युच्युअल फंडमध्ये १०% ते १५% मिळणाऱ्या व्याजावर केलेली गुंतवणूक यातील फरक हा अशाच स्वरूपाचा आहे.
म्युच्युअल फंडामध्ये व बँकेत मिळणाऱ्या व्याजाचा फरक हा एका वर्षाच्या कालावधीसाठी बघितल्यास कमी वाटतो व 2% ते 4% वाढीव व्याजामुळे आपल्याला काही फरक पडत नाही असे वाटते, पण १० वर्षाच्या कालावधीमध्ये 4% चक्रवाढ व्याजाच्या वाढीव फरकामुळे १ लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर किमान 5 लाख रुपयांचा फरक, मिळणाऱ्या व्याजावर पडू शकतो.
म्हणूनच 2% ते 4% चाच फरक आहे असा विचार न करता अंतिमतः १० ते १५ वर्षाच्या कालावधीमध्ये आपल्या म्युच्युअल फंडामधील गुंतवणूक ही १००% ते २००% परतावा देऊन आपल्याला लाखोपती बनवू शकते याचा विचार गुंतवणूक करतानाच करणे उचित आहे.