सोने किंवा जमीन यासारखी भौतिक मालकी असणे म्हणजे गुंतवणूक असा भारतीयांमध्ये सर्वसाधारण  समज आहे. परंतु, बदलत्या काळात गुंतवणुकीच्या नमुन्यांमध्ये कमालीचे परिवर्तन आलेले दिसते. अलीकडे भारतीय गुंतवणूकदारही कंपन्यांचे समभाग, रोखे आणि म्युच्युअल फंड अशा अत्याधुनिक वित्तीय मालमत्तेकडे वळत आहेत. देशातील तरुण या बदलामागचे शिलेदार आहेत. हे युवकही शिकाऊ अवस्थेत असून त्यांना मार्गदर्शनाची गरज आहे.

शिक्षितांमध्येही वित्तीय शिक्षणाचा अभाव दिसतो. गुंतवणुकीची संकल्पना समजून घेण्यासाठी गुंतवणुकीवरील काही सोपी पुस्तके वाचावीत. ज्यामुळे हा विषय स्पष्ट होण्यासाठी मदत होते. गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला व्यावसायिक बनण्याची गरज नाही. उलट कठीण संकल्पना उलगडून, वित्तीय कपोलकल्पना दूर करणे महत्त्वाचे ठरते.

थोडय़ा फार प्रमाणातील  संशोधनातून एखाद्यला जाणवते की, स्मार्ट गुंतवणूक हा महागाईचा दर आटोक्यात आणण्यासाठीचा एकमेव पर्याय आहे. महागाई आणि कर हे परताव्यातील महत्त्वाचे अडसर आहेत, हे लक्षात घेतले पाहिजे. कारण या दोन घटकांमुळे फार कमी परतावा (रिटर्न) हातात येतो.

म्हणून सुरुवात लवकर करा

गुंतवणुकीला लवकर सुरुवात करणे म्हणजे चक्रवाढ व्याजाचा   फायदा घेणे होय. गुंतवणूक वयाच्या लवकरच्या टप्प्यात केल्याने गुंतवणूक वाढण्यास वेळ मिळतो आणि बाजाराच्या अस्थिरतेपासून सावरायची संधी मिळते. चालढकल क्वचितच माणसाच्या आयुष्यात मदतीची ठरते. गुंतवणूक त्यापैकीच एक आहे. मुळातच चांगल्या स्टॉक/ म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक केल्याने त्याचे दीर्घकालीन परिणाम दिसतात, हा एक चांगला मार्ग आहे.

एखाद्याला मालकीच्या घरात राहताना किंवा कुटुंबासोबत राहताना अडथळ्यांचा सामना करावा लागतो, सामान्यपणे तरुणाईचे मुलभूत खर्च फार जास्त असतात. जेव्हा गुंतवणुकीच्या बचतीचा मुद्दा येतो, तेव्हा हे आव्हानात्मक ठरते. सिस्टीमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लान्स (एसआयपी) हा समस्येवरचा उतारा आहे.

थोडय़ा एसआयपीसाठी महिन्याच्या मिळकतीमधील काही भाग बाजूला ठेवावा. यामुळे रक्कम शिलकीत पडेल व काही कालावधीतच तुमची बचत निश्चितच वाढेल. यासाठी सल्लागाराची मदत घेणे उचीत!!

अभिप्राय द्या!