गेल्या अनेक संपादकीयातून आपण म्युच्युअल फंडात गुंतवणूक करून फायदा मिळवा असे सांगण्यात येत आहे . अनेकांना , ज्यांना याबाबत काही माहिती नसेल त्यांना
गुंतवणुकीसाठी म्युच्युअल फंडच का? असा प्रश्न पडला असणार .
या प्रश्नाची एक ना अनेक रास्त कारणे आहेत. पण त्या आधी म्युच्युअल फंडाबद्दल थोडक्यात सांगायचे झाले तर असे म्हणता येईल की, अनेक लोकांना शेअर बाजारात गुंतवणूक करावीशी वाटते. त्यांच्याकडे रक्कम असली तरी त्यांना शेअर बाजाराचे ज्ञान पुरेशा प्रमाणात नसते. म्हणून समान उद्दिष्ट असणाऱ्या सर्व गुंतवणूकदारांची गुंतवणूक एकत्र केली जाते आणि या बदल्यात गुंतवणूकदाराला युनिट्स अदा केली जातात. (गुंतवणूक केलेले रुपये भागिले त्या दिवशीचे गुंतवणूक मूल्य (एनएव्ही) = गुंतवणूकदाराला अदा केलेली युनिट्स). म्युच्युअल फंडांचा निधी व्यवस्थापक निर्धारित उद्दिष्टाला अनुसरून शेअर्स, डिबेंचर्स, इ वेगवेगळ्या गुंतवणुकीच्या पर्यायांमध्ये गुंतवणूक करतात.
रोजच्या रोज सायंकाळी गुंतवणुकीचे मूल्यांकन केले जाते आणि प्रत्येक युनिटचे मूल्य (एनएव्ही) जाहीर केले जाते. अशा प्रकारे म्युच्युअल फंड गुंतवणूकदाराला तुलनेने कमी खर्चात, व्यावसायिक आणि अभ्यासपूर्ण पद्धतीने, तज्ज्ञ व्यवस्थापन करीत, गुंतवणुकीची संधी उपलब्ध होते.
व ही गुंतवणूक बाजाराशी संबंधित असल्याने त्यात वाढ ही होताच असते व ही वाढ पारंपारिक बचतीच्या साधनांपेक्षा निश्चितच जादा परतावा देणारी असते . म्हणून प्रत्येकाने किमान एका तरी SIP चा अनुभव सल्लागाराच्या मदतीने घ्यावा असे धनलाभ तर्फे आवाहन आहे .