काल याच ठिकाणी म्युच्युअल फंडच का ? याचा भाग १ प्रसिद्ध केला आहे .

अनेकांनी त्याबाबतीत विचारणा केल्याने आज त्याचा पुढील भाग या ठिकाणी थोडक्यात देत आहे.

  • एकूण गुंतवणुकीचे व्यवस्थापन करण्यासाठी निधी व्यवस्थापकाची नेमणूक केली जाते. त्याला लागणारे तज्ज्ञ साहाय्यक आणि इतर गोष्टींची तरतूद केली जाते. एकूण गुंतवणूक ही अशा तज्ज्ञामार्फत व्यवस्थापित केली जाते. बाजारातील माहिती गोळा करणे, त्यावर अभ्यास करणे, भविष्यातील जोखीम ओळखणे आणि जोखमीचे निवारण करण्यासाठी लागणारी उपाययोजना करणे, निधी व्यवस्थापक आणि त्याची साहाय्यक यंत्रणा करीत असत
  •  शेअर बाजारात थेट गुंतवणूक करायची असेल तर त्यासाठी तुलनेने बऱ्यापैकी निधी असावा लागतो, परंतु म्युच्युअल फंडामध्ये अगदी ५00 रुपये गुंतवून एकाच वेळेस विविध पर्यायांमध्ये गुंतवणूक विभागण्याचा लाभ मिळविता येतो.
  • या पर्यायामध्ये गुंतवणूक ही तज्ज्ञांमार्फत केली जात असल्याने इतर पर्यायांच्या तुलनेत जोखीम कमी असते. कारण म्युच्युअल फंडांमध्ये प्रत्येक क्षेत्राचा अभ्यासासाठी तज्ज्ञ उपलब्ध असतो. हे तज्ज्ञ गुंतवणुकीतील जोखीम हाताळण्याचे काम करतात.
  • म्युच्युअल फंडामध्ये काही विशिष्ट योजना आहेत ज्यात गुंतवणूक केली असता आपणास गरजेनुसार रुपये भरता अथवा गरज पडेल तेव्हा काढता येतात.
  • सेबी या नियामक यंत्रणेमार्फत म्युच्युअल फंडाचे नियमन केले जाते. त्यामुळे कुठल्याही प्रकारच्या गैरव्यवहारास प्रतिबंध असतो. म्युच्युअल फंडास, त्यांनी गुंतवणूक करण्यास निवडलेले विविध पर्याय वेळोवेळी प्रकाशित करणे बंधनकारक असते. त्यामुळे व्यवहार पारदर्शक असल्याची खात्री देता येते.
  • या सर्व बाबी एकत्रितपणे अन्य कोठेही क्वचितच आढळतात . म्हणून म्युच्युअल फंडातील गुंतवणूक हितावह आहे !!

अभिप्राय द्या!