आज शेवटचा दिवस

‘हॅथवे केबल अँड डेटाकॉम‘ची उपकंपनी ‘जीटीपीएल हॅथवे’च्या प्राथमिक समभाग विक्रीला(इनिशिअल पब्लिक ऑफरिंग) 21 जून रोजी सुरुवात होत आहे. यापुढे 23 जूनपर्यंत चालणाऱ्या विक्रीसाठी कंपनीने प्रतिशेअर 167 ते 170 रुपयांचा किंमतपट्टा निश्चित केला आहे.
प्रस्तावित योजनेत, कंपनी 240 कोटी रुपयांच्या नव्या शेअर्सची विक्री करणार आहे. याशिवाय, ‘ऑफर फॉर सेल’द्वारे 1.44 कोटी शेअर्सची विक्री केली जाणार आहे. यापैकी जीटीपीएल हॅथवेची पालक कंपनी हॅथवे केबल अँड डेटाकॉम 72 लाख शेअर्सची विक्री करणार आहे. हॅथवेकडे कंपनीच्या 50 टक्के अर्थात 4.92 कोटी शेअर्सची मालकी आहे. आयपीओतून मिळालेल्या भांडवलाचा उपयोग प्रामुख्याने कर्जाच्या परतफेडीसाठी केला जाणार आहे.

याच्या खरेदीसाठी dmat account आवश्यक असून मागणीपत्र “शेअरखान “ पाटील towers सावंतवाडी येथे उपलब्ध आहेत !!

अभिप्राय द्या!