काल सम्पादकीयामधून सेक्टोरिअल फंड कशा स्थितीत फायदेशीर ठरतात हे सविस्तर लिहिले आहे. आज अश्याच एका सेक्टरची माहिती देत आहे की ज्यामधील गुंतवणूक निश्चितच भरघोस उत्पन्न देऊ शकते; पण त्यासाठी थोडा धीर धरावा लागणार आहे .

अमेरिकेच्या प्रगत भांडवली बाजारात अनेक सिद्धांतनी असे सिद्ध केले आहे की गुंतवणुकीत ‘व्हॅल्यू इन्व्हेस्टमेंट’ रणनीतीचा अवलंब केल्यास निर्देशांकाहून अधिक परतावा मिळविता येतो. एखाद्या समभागाच्या बाजारात उपलब्ध असलेल्या किंमतींपेक्षा त्या समभागाचे मोल अधिक असते त्यावेळी गुंतवणूक केल्यास अधिक फायदा होतो. थोडक्यात गुंतवणुकदारांची तत्कालीन पसंती गमावलेल्या क्षेत्रात गुंतवणूक केल्यास नफा होण्याची संधी अधिक असते. म्युच्युअल फंडातील बिझनेस सायकल फंड हे भविष्यात अव्वल कामगिरी करणाऱ्या उद्योगात गुंतवणूक करतात. सध्या आरोग्य निगा व औषध निर्माण क्षेत्र नियंत्रक व सरकारी विपरीत धोरणांचा सामना करीत आहे. या उद्योग क्षेत्रातील अनेक कंपन्यांचे समभाग २—३ वर्षांंच्या तळाला आहे आहेत. म्हणूनच या उद्योग क्षेत्रात नवीन गुंतवणुकीची संधी उपलब्ध आहे. विविध कारणांनी औषध निर्माण व आरोग्य निगा क्षेत्राकडे गुंतवणूकदारांनी पाठ फिरविण्यास सुरुवात केली आणि त्याला आता दोन अडीच वर्षे होत आहेत. अनेक कारणांनी हे क्षेत्र व्हॅल्यू इन्व्हेस्टरनां खुणावू लागले आहे. अनेक व्हॅल्यू फंडात दोन अडीच वर्षांंनी भांडवली वृद्धीची संधी असल्याने या उद्योग क्षेत्रातील समभागांचा समावेश होऊ लागला आहे. सेन्सेक्सने ३१ हजाराचा टप्पा पार केला असताना आणि नव्याने गुंतवणूक करण्यात धोका वाढत असतांना कमी जोखीम पत्करून चार—पाच वर्षे थांबण्याची तयारी असलेल्या गुंतवणूकदारांना गुंतवणुकीवर १५ ते २० टक्के भांडवली वृद्धी मिळण्याची क्षमता असलेले हे क्षेत्र आहे. या क्षेत्रात गुंतवणूक करण्याच्या चार उपलब्ध पर्यायांपैकी रिलायन्स फार्मा फंडाचा म्युच्युअल फंड गुंतवणूकदार विचार करू शकतात.आरोग्यनिगा क्षेत्रातील कंपन्यांच्या आजचा बाजारभाव गुंतवणुकीसाठी रास्तचआहे.

भाव सध्या जरी न्यूनतम पातळीवर असला तरी गुंतावणूकदारानी SIP हाच पर्याय स्वीकारावा हि सुद्धा महत्वाची सूचना धनलाभ तर्फे आहे !!

 

 

अभिप्राय द्या!