सेक्टोरिअल फंड
म्युच्युअल फंडमध्ये आत्तापर्यंत संपादकीय मधून लार्जकॅप फंड, मिडकॅप फंड व DEBT फंडाबद्दल वेगवेगळ्या स्वरूपात माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे.
या सर्वांहून सेक्टोरिअल फंड हे थोडेसे वेगळ्या स्वरूपाचे असतात. फंड मॅनेजर त्याच्याकडे असलेला सर्व निधी एकाच सेक्टर मधल्या वेगवेगळ्या समभागांमध्ये निर्धारित प्रमाणानुसार गुंतवतो. या निर्धारित सेक्टरपेक्षा अन्य समभागांमध्ये गुंतवणूक करण्यास फंड मॅनेजरला परवानगी नसते.
अशा फंडाचा परतावा जागतिक घडामोडी, शासकीय निर्णय तसेच रुपयाचे मूल्य या बाबींवर विशेषतः अवलंबून असतो.
यामध्ये गुंतवणूक करताना पुढील वर्षात कोणते निर्णय सेक्टरच्या फायद्याचे ठरू शकतात याचा अंदाज आल्यास गुंतवणूक करणे फायद्याचे ठरते.
गेल्या वर्षभरात केंद्र सरकार बँकांचे NPA कमी करण्यासाठी किंवा मोठ्या कर्जदारांची कर्जे Reform करण्यासाठी अनेक निर्णय घेत असल्याने Banking & Finance सेक्टरमधील गुंतवणुकीवर २०% ते २५% परतावा मिळालेला आहे.
पण मागील सरकारच्या काळात Infrastructure संबंधात कोणताही परिणामकारक निर्णय न घेतल्याने त्या सेक्टरमधल्या फंडामधील वाढ ही अत्यल्प किंवा माफक राहिली आहे.
सध्या GST संबंधात अंतिम निर्णय दृष्टीपथात आल्याने Logistic व Transportation सेक्टरमधील फंड चांगला परतावा देत आहेत. पण गेल्या वर्षभरात US FDA चे तपासणीचे निकष अत्यंत कडक झाल्याने किंवा अमेरिकन शासनाने विसा संबंधात काही निर्णय वेगळ्या स्वरूपाचे घेतल्याने Pharma सेक्टरचा परतावा उणे स्वरूपात राहिला आहे.
पण यापुढे निकषाबरहुकुम काम करून Sunpharma, Glenmark, Dr. Reddy या कंपन्या आपल्या समभागाचे भाव आत्ता आहेत त्यापेक्षा कमी होवू देणार नाही याची खात्री सर्व समभाग धारकांना आहे.
म्हणून आतापासून पुढे Pharma सेक्टरमध्ये एकरकमी गुंतवणूक किंवा सिप द्वारे गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळू शकेल अशी आजची स्थिती दिसत आहे.
एकंदरीत कुठल्याही सेक्टोरिअल फंडामध्ये पैसे गुंतवताना त्या सेक्टरमधल्या समभागांची स्थिती पाहूनच आपला निर्णय आपण घेणे योग्य होवू शकते. असे निर्णय घेताना फक्त एकत्रित फंड मालमत्ता पाहणेही आवश्यक आहे.
काही चांगले सेक्टोरिअल फंड पुढे दिले आहेत-
फंडाचे नाव ३ वर्षातील परतावा
Canara Roboco Infrastructure Fund १४%
ICICI Pru. Banking and Financial Sector Fund 24%
SBI Pharma Sector Fund 13%
SBI FMCG Fund 18%