येत्या 1 जुलैपासून देशभरात वस्तू आणि सेवाकर (जीएसटी) लागू होणार आहे. त्यामुळे विमा कंपन्यांचे हप्ते आणि क्रेडिट कार्ड सेवा महागणार आहेत. सध्या या सेवांवर 15 टक्के सेवाकर आकाराला जातो. मात्र येत्या 1 जुलैला जीएसटी लागू झाल्यानंतर सेवाकर 15 टक्क्यांवरून 18 टक्के करण्यात येणार आहे. परिणामी आता टर्म पॉलिसीच्या आणि युनिट लिंक्ड इन्शुरन्सच्या हप्त्यामध्ये वाढ होणार आहे. शिवाय एंडोमेंट पॉलिसीवर ग्राहकांना 1.88 टक्के दराने सेवा कर भरावा लागतो. तो आता जीएसटीनंतर 2.25 टक्के होणार आहे.
जीएसटीनंतर करांमध्ये वाढ होणार असल्याने वाढणार्‍या करांबद्दल बॅंका, विमा कंपन्या आणि क्रेडिट कार्ड सेवा पुरवणार्‍या कंपन्यांनी आपल्या ग्राहकांना वाढीबद्दल माहिती देण्यास सुरूवात केली आहे. एसबीआय कार्ड, स्टँडर्ड चार्टर्ड, एचडीएफसी, आयसीआयसीआय प्रुडेन्शियल यांनी आपल्या ग्राहकांना आता एसएमएस आणि ई-मेलच्या माध्यमातून माहिती देण्यास सुरूवात केली आहे.

अभिप्राय द्या!