सध्या तंत्रज्ञानामुळे अनेक गोष्टी सोप्या वाटतात. अर्थसाक्षरतादेखील वाढते आहे. गुंतवणूक सल्लागाराला योग्य प्रश्न विचारून स्वत:च्या शंकांचे निरसन करून घेऊन मगच गुंतवणूक करावी. सुज्ञतेचा हाच मार्ग आहे. अनेक गुंतवणूकदाराप्रमाणे रवींद्ररावाना पडलेला प्रश्न अगदी वास्तविक होता. त्यांनी  विचारले की, एकरकमी गुंतवणूक करणे योग्य असते की थोडीथोडकी पण नियमित गुंतवणूक करणे चांगले? कोणता पर्याय योग्य?

खरे तर, या प्रश्नांचे उत्तर अनेक घटकांवर अवलंबून आहे. जसे गुंतवणुकीचे उद्दिष्ट, कालावधी, जोखीम घेण्याची क्षमता, जबाबदाऱ्या, वय इ. एकदाच एकरकमी गुंतवणूक करण्याची क्षमता असेल तर ती रक्कम दीर्घ मुदतीसाठी गुंतवावी. मात्र अशा गुंतवणुकीत जोखीम जास्त.पण  थांबण्याची तयारीअसल्यास फायदा हमखास !!

परंतु नियमित गुंतवणूक करणे हे सर्वसामान्यपणे प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी योग्य असते. नियमित गुंतवणुकीच्या अनेक पर्यायांपैकी एक उत्तम पर्याय म्हणजे –

म्युच्युअल फंड सही है !!

 

 

अभिप्राय द्या!