बँकेच्या पासबुक आणि स्टेटमेंटमध्ये बँकांनी सर्व तपशील भरावेत, अशी  सूचना रिझर्व्ह बँकेने दिली आहे .

बँकांनी पासबुक अथवा स्टेटमेंटमध्ये चेक ज्याला दिला आहे त्याचे नाव, व्यवहाराचा प्रकार, आकारण्यात आलेल्या शुल्काचा प्रकार, कमिशन, दंडाची रक्कम आणि खाते क्रमांक आदी बाबींचा अंतर्भाव करणे आवश्यक असल्याचे रिझर्व्ह बँकेच्या आदेशात नमूद केले असून या शिवाय पासबुकमध्ये करण्यात येणाऱ्या नोंदी ग्राहकांना समजेल अशाच पद्धतीने करण्याचीही अट घालण्यात आली आहे. देशातील अनेक बँकांकडून पासबुक आणि स्टेटमेंटमधील नोंदी ग्राहकांच्या संभ्रमात भर घालणाऱ्या असल्याच्या तक्रारी रिझर्व्ह बँकेकडे प्राप्त झाल्या आहेत त्यामुळे हा निर्णय घेतला गेला असावा .

यासाठी किती शुल्क आकारणी होणार ते मात्र माहित नाही !! पण यामुळे काही अंशी बँकेमधील गर्दी नियंत्रणात राहू शकेल .

अभिप्राय द्या!