जितक्या कमी वयात आपण फंडात गुंतवणूक करू तेवढे सुमधुर फळ आपल्याला मिळेल यात शंकाच नाही. यासाठी सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लान अर्थात ‘एसआयपी’ या इतका सुंदर  पर्याय असूच शकत नाही. एकरकमी गुंतवणूक करताना आपल्याला बाजाराचा अंदाज घ्यावा लागतो, आणि ते नक्कीच सुलभ नाही अशावेळी दर महिना एक स्थिर रक्कम फंडात गुंतवल्यास बाजाराच्या चढ उताराचा आपल्याला फायदा मिळतो आणि जोखीम कमी होते. तुमच्या आर्थिक गरजा वेळेवर पूर्ण करेल आणि तुम्हाला दीर्घकालीन समृद्धी देईल तीच खरी आदर्श गुंतवणूक असते. हे विचारात घेऊन तरुणांनी आता नया सोच अंगीकारायला हवाच!

म्युच्युअल फंड गुंतवणुकीतून हे शक्य आहे..!

अगदी कमी पैशातून तुम्हाला गुंतवणूक करता येईल
गुंतवणूक एकरकमी न करता टप्प्याटप्प्याने करायची आहे
जोखीमही हवी आहे मात्र शाश्वत परतावाही हवाय
गुंतवलेले पैसे गरज लागली तर त्वरीत मिळायला हवेत
कर बचत करायची आहे

अभिप्राय द्या!