सामान्य माणसाच्या दृष्टीने गुंतवणूक करताना मुख्य दोन मुद्दे असतात.

त्यातील एक म्हणजे गुंतवणूक सुरक्षित आहे ना?

दुसरा त्यात व्याज किती मिळणार?

अनेक वर्षांपासून बँक मुदत ठेवी, भविष्य निर्वाह निधी आणि पोस्टाच्या योजनांतील ठेवी या पारंपरिक गुंतवणूक पर्यायांचा अवलंब आपण करत आलो आहोत.

सर्वसामान्य मराठी घरात शेअर बाजार आणि त्याबाबतीत गुंतवणुकीसाठी फारसे पोषक वातावरण नसते. मात्र हे चित्र अलीकडील काळात बदलत चालले आहे. मात्र थेट शेअर्सची गुंतवणूक सगळ्यांना शक्य होईलच असे नाही. वेळेची उपलब्धता, शेअर बाजाराचा शास्त्रशुद्ध अभ्यास आणि आवश्यक तेवढे भांडवल ही त्रिसूत्री नेहमी जमेलच असे नाही. यावेळी म्युच्युअल फंड हा एक भरवशाचा पर्याय ठरतो.

याद्वारे तुम्हाला अगदी कमी पैशाची गुंतवणूक ,जोखीम व शाश्वत परतावा ह्या बाबी शक्य आहेत तसेच कर बचतही   शक्य आहे!

यासाठी शिस्तबद्ध गुंतवणूक करायला पाहिजे. पडत्या व्याजदर आणि चढय़ा महागाईच्या काळात फंडातील गुंतवणूक किफायतशीर ठरते यात शंकाच नाही. तुम्ही ज्या फंडात गुंतवणूक करता त्याची  माहिती तुम्हाला वेबस्थळावरून मिळू शकते. . आपण म्युच्युअल फंडाची जाहिरात वाचतो तेव्हा त्यात ‘गुंतवणूक करण्याआधी दस्तावेज पाहा’ अशी सूचना केलेली असते, यासाठी रिस्कोमीटर’ हा नवीन आणि सुलभ पर्याय  आला आहे. तो पाहून आपणही योग्य निर्णयाप्रत येऊ शकतो . पण सुरवातीला सल्लागाराकडून सर्व माहिती घेणे केव्हाही उचित !!!!

अभिप्राय द्या!