शेअर बाजारात तेजी चालू राहण्याची कारणे काय आहेत?
व्याजदर सातत्याने खाली येत आहेत, त्यामुळे पारंपरिक गुंतवणुकीचे मार्ग अतिशय कमी परतावा देत आहेत. वाढती जागरूकता व पारदर्शकता यामुळे शेअर बाजार व म्युच्युअल फंड याकडे गुंतवणुकीचा चांगला पर्याय म्हणून बघितले जात आहे. तसेच, शेअर व म्युच्युअल फंडामधील एक वर्षापेक्षा अधिक काळासाठी केलेली गुंतवणूक ही करमुक्त आहे. भारत हा जगातील एकमेव देश आहे, की जो 6.5 टक्के दराने प्रगती करीत आहे. लोकसंख्येच्या बाबतीत भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे, त्यामुळे देशांतर्गत मागणी मोठी आहे. त्यातच लवकरच “जीएसटी’ लागू होणार आहे, जेणेकरून “लॉजिस्टिक्‍स’ एकाच कराच्या अंतर्गत येऊन ही यंत्रणा व्यवस्थितपणे कार्यरत होईल. वरील सर्व बाबींचा विचार करता, देशांतर्गत; तसेच परदेशी गुंतवणूकदार भारतीय शेअर बाजारात पैसे गुंतवतील, त्यामुळे भविष्यात तेजीला बळ मिळण्याची शक्‍यता वाटते.

अभिप्राय द्या!

Close Menu