सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बॅंक असलेल्या स्टेट बॅंकेने (एसबीआय) करदात्यांना इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातून किंवा क्रेडिट / डेबिट कार्डद्वारे वस्तू आणि सेवाकर (जीएसटी) भरण्याची सुविधा उबलब्ध करून दिली आहे. एसबीआयने ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे.

देशात 1 जुलैपासून जीएसटी लागू झाला आहे. त्यापार्श्वभूमीवर एसबीआयने देशभरातील सर्व शाखांमध्ये जीएसटीची चलने स्वीकारण्यास सुरूवात केली आहे.

”इंटरनेट बँकिंग किंवा एसबीआय डेबिट कार्डाच्या माध्यमांद्वारे जीएसटी ऑनलाइन भरणा करता येणार आहे. शिवाय देशभरातील एसबीआयच्या 25,473 शाखांमध्ये रोख रक्कम / चेक / ड्राफ्टच्या माध्यमातून दहा हजार रुपयांपर्यंतचा जीएसटीचा भरणा करता येईल,’

अभिप्राय द्या!