रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) इलेक्ट्रॉनिक बॅंकिंग व्यवहारांना अधिक सुरक्षित करण्यासाठी नवीन नियम लागू केले आहेत. त्यामुळे एखाद्या व्यक्तीच्या खात्यातून त्या व्यक्तीच्या नकळत अनधिकृत देवाण-घेवाण झाली असल्यास अशा बँकिंग व्यवहारांची माहिती तीन दिवसांच्या आत बॅंकेला दिल्यास ग्राहकांना नुकसान होणार नाही. शिवाय 10 दिवसांच्या आत संबंधित खात्यांमध्ये पैसे जमा करण्यात येणार आहे, आरबीआयने या सूचना दिल्या आहेत.

आरबीआयच्या नव्या प्रयत्नांमुळे लोकांचा बँकिंग व्यवस्थेवरील विश्वास वाढणार असून ग्राहकांची होणारी फसवणूक थांबण्यास मदत मिळणार आहे. आरबीआयने झिरो लाइयबिलिटी म्हणजेच शून्य दायित्व आणि लिमीटेड लाइयबिलिटी अर्थातच मर्यादित दायित्व या संकल्पनेची सुरूवात केली आहे. या संकल्पनेचा फायदा सर्व बँकेतील ग्राहकांना मिळणारआहेत.

अभिप्राय द्या!