देशात एक जुलैपासून जीएसटी लागू करण्यात आल्यानंतर विविध जीएसटी दरांबाबत असलेला संभ्रम दूर करण्यासाठी केंद्र सरकारने GST Rate Finder हे सर्वांसाठी उपयुक्त असं अॅप लॉन्च केलं आहे. उत्पादन आणि सीमा शुल्क विभागाच्या केंद्रीय बोर्डाने (सीबीईसी) हे अॅप तयार केले असून वस्तू आणि सेवांच्या नव्या दरांची संपूर्ण यादी यावर देण्यात आली आहे.
या अॅपमध्ये वेगवेगळ्या जीएसटी दरांनुसार सात विभागांत वस्तू विभागण्यात आल्या आहेत. ० टक्के, ०.२५ टक्के, ३ टक्के, ५ टक्के, १२ टक्के, १८ टक्के आणि २८ टक्के असे विभाग बनवण्यात आले आहेत. याप्रमाणेच विविध सेवा पाच विभागांत विभागण्यात आल्या आहेत. ० टक्के, ५ टक्के, १२ टक्के, १८ टक्के आणि २८ टक्के, असे हे विभाग असतील. एखाद्या विशिष्ट वस्तू वा सेवेवरील जीएसटी दर हवा असल्यास त्यासाठी सर्च ऑप्शन देण्यात आला आहे. वस्तू किंवा सेवेचे नाव टाकून सर्च केल्यास त्याबाबतचा तपशील आपणास मिळू शकणार आहे.

याचा सुयोग्य वापर फसवणूक टाळण्यासाठी ग्राहकानी करावा असे आवाहन धनलाभतर्फे करण्यात येत आहे !!

अभिप्राय द्या!

Close Menu