पॅनसाठी अर्ज करणे, कर भरणे आता ऍपद्वारे शक्‍य झाले आहे. याकरिता प्राप्तिकर विभागाने ऍप तयार केले आहे. हे ऍप करभरणा, पॅन कार्डसाठी अर्ज करणे, टीडीएस आदींसाठी उपयुक्त ठरणार आहे. याचसोबत या ऍपद्बारे आधार कार्ड पॅन कार्डला जोडता येणार आहे. “आयकर सेतू’ असे या ऍपचे नाव आहे या ऍपचे आजच अनावरण करण्यात आले. नावाप्रमाणेच हे ऍप करदात्यांसाठी एक सेतू ठरणार आहे.

करदात्यांचे व्यवस्थेमधील अडथळे दूर करून सुलभ करभरणा आणि सोपी प्रक्रिया करण्याकडे “सीबीडीटी’चा कल आहे. त्यातून नावीण्यपूर्ण उपक्रमांद्वारे सीबीडीटी प्रक्रिया सुलभ करण्याचा प्रयत्न करत आहे. यासाठी आता सीबीडीटी थेट करदात्यांशी संपर्क साधणार आहे; तसेच करदात्यांना कराविषयी महत्त्वाची माहिती देण्यात येणार आहे.

अभिप्राय द्या!

Close Menu