सेवानिवृत्ती नियोजन म्हणजे, काही पैसा बाजूला काढून ठेवणे किंवा अशी संपत्ती आपल्यापाशी असणे ज्यातून आपणास उतारवयात उत्पन्न प्राप्त होईल. हे सर्व निवृत्तीपर्यंत पोहोचण्याच्या आधीच करून ठेवायला हवे. निवृत्ती योजनेशी विविध पैलू निगडीत असतात. त्यामुळे कधीहि लवकर सुरुवात करणे फायद्याचेच ठरते. तुम्ही तुमचे निवृत्ती लक्ष्य सुनिश्चित करा. निवृत्तीपूर्वीच तुम्हाला निवृत्तीसाठी बचत योजना सुरु करणे गरजेचे होईल. खाली दिलेल्या चार पायऱ्यांचा व्यवस्थित अवलंब करा जेणे करून तुमचा अतिशय आदर्श असा निवृत्ती नियोजनाचा मार्ग सूकर होईल.
- सर्व प्रथम हे निश्चित करा की निवृत्तीनंतरच्या काळात समाधानी जीवन जगण्यास तुम्हाला किती पैसे उत्पन्न लागणार. एक लक्षात ठेवा, यात वाढणारे इस्पितळ खर्च, इतर खर्च व कुटुंबाकरिता भेट वस्तू ईत्यादी खर्च पकडा.
- निवृत्तीच्या वेळेस एकदम प्राप्त होणाऱ्या रकमेचा हिशेब करून ठेवा.
- तुमच्या निवृत्तीच्या सर्व गरजा भागविण्यास सक्षम अशाच निवृत्ती योजनेची निवड करा. सहसा अशा मालामात्तांमधे गुंतवणूक करण्याकडे कल असू दया ज्या तुम्हाला दीर्घावधीत जास्त परतावा देऊ शकतील.
- अतिशय लवकर बचतीस सुरुवात करा. जेणे करून वेळ तुमच्या बाजूने राहील व तुम्ही चक्रवाढतेचा लाभ उठवू शकाल.
किती निवृत्ती वेतनाची मला खरोखर गरज आहे?
एक साधा नियम असा आहे की सध्याच्या उत्पन्नाच्या ७० ते ९० टक्के रक्कम निवृत्ती नंतर तुम्हाला लागणार. जर तुम्ही रु. २०,००० कमवत असाल, (आयकराच्या पूर्वी) मग तुम्हाला रु. १५,००० ते रु. २०,००० निवृत्तीनंतर लागणार, जे की तुमचे निवृत्तीनंतरही जीवनमान चांगले ठेवण्यास मदत करेल. खालील उदाहरणाने, तुम्हाला नियमित उत्पन्न प्राप्त होण्यासाठी किती निवृत्तीपुंजी असायला हवी? ते समजण्यास मदत होईल.
- निवृत्ती वय : ६०
- सध्याचे वय : ५८
- अपेक्षित आयुष्य : ८३
- निवृत्तीनंतरची वर्ष : २३
- सध्याचे वार्षिक खर्च : रु. १.८० लाख
- गुंतवणुकीवर वार्षिक व्याज : १२%
- महागाई : ५%
- महागाई धरून मिळणारे व्याज : ७%
- एकूण निवृत्ती पुंजी आवश्यक : रु. १५ लाख
सेवानिवृत्त होणे हा जीवनातील एक वेगळाच अतिशय महत्वाचा भाग आहे. निवृत्ती देखील योजनाबध्द असावी, हा एक वेगळाच विचार असतो. प्रत्येकालाच निवृत्तीचा काळ शांतपणे सुखयुक्त जावा असे वाटते. परंतु योग्य योजना असल्याशिवाय असे होणे शक्य नाही. पहिल्यपेक्षा आता आयुर्मान वाढल्याने व्यक्ती जास्त दिवस जगायला लागल्या आहेत. जी की चांगली गोष्ट आहे. म्हणजेच याचा अर्थ निवृत्ती पहिल्या पेक्षा जास्त खर्चिक झाली आहे. त्यामुळे योग्य योजना निवडणे व आर्थिक दृष्ट्या सबळ राहणे हेच चांगले.
निवृत्ती योजना
- मासीक उत्पन्न योजना : पोस्ट विभाग किंवा बँकामधील मासिक उत्पन्न योजना देखील एखादा व्यक्ती घेऊ शकतो. या योजना नियमित व्याज, उत्पन्न म्हणून प्राप्त करून देतात. यामुळे रोख व सुरक्षितता दोन्ही प्राप्त होते. सध्या पोस्ट विभागात मासिक उत्पन्न योजनेचा दर ८ टक्के आहे.
- म्युचुअल फंड : म्युचुअल फंड म्हणजे सहसा तज्ञ मंडळीकडून सांभाळल्या जाणाऱ्या अशा पैशांचा स्त्रोत जो की, एखाद्या गुंतवणूकदारांच्या समूहाकडून आलेला असतो. म्युचुअल फंडाचे प्रबंधक तुमचा पैसा विविध रोख्यांमधे जसे की, शेअर, रोखे बंध, किंवा बाजारातील अन्य विकाल्पांमधे अथवा या सर्वांच्या मिश्र योजनेत गुंतवतात. यात फंडांचे गुंतवणुक उदिष्ट ठरलेले असते. म्युचुअल फंडात गुंतवणूक करून तुम्ही तुमच्या गुंतवणुकीचे विकेंद्रिकरण करू शकता. शिवाय जोखीम देखील थोडी कमी होते. म्युचुअल फंडांची त्यांच्या रचनेनुसार विभागणी होते. खुल्या योजना नेहमीच युनिटची विक्री व खरेदी करीत असतात. जेव्हा फंड विकतात गुंतवणूकदारा खरेदी करतात आणि जेव्हा गुंतवणूकदार पैसा काढतात, तेव्हा हे फंड पुन्हा युनिटची खरेदी करतात. खरेदी किंवा पैसे काढणे हे सर्व एकूण मालमत्तेच्या किमतीवर आधारीत असते.
- पद्धतशीर गुंतवणूक योजना (SIP) : ही अतिशय सोपी व शिस्तबध्दरीत्या पैसा म्युच्युअल फंडात गुंतवणुकीची पध्दत आहे. दीर्घवधीत भरपूर पैसा जमविण्यासाठी ही योजना चांगली असते. एकदम गुंतवणूक करणाऱ्यांपेक्षा अशा प्रकारे गुंतवणूक केली असता अतिशय चांगले परतावे प्राप्त होतात. आवर्ति ठेव योजने प्रमाणेच यात देखील एक ठराविक किमतीच्या वरती युनिट विकून सहा महिन्यांच्या काळात तुम्हाला नफा प्राप्त होणार. एक ठराविक रक्कम निश्चित काळानंतर नियमितपणे म्युच्युअल फंडात भरली जाते. बाजारातील चढ उतारांवर दुर्लक्ष करून अशा योजना प्रत्येक महिन्यात युनिट खरेदी तुम्हाला करू देतात. तुमची गुंतवणूक तितकीच राहते, फक्त बाजार खाली असेल, तर त्या पैशात जास्त युनिट मिळतील अथवा वरती असेल तर कमी युनिट मिळणार. त्यामुळे एकदा का या विकल्पाची निवड केली, तर तुमचा बाजारातील बाजारातील सहभाग तसाच वाढतो. पध्दतशीर गुंतवणूक योजना ही पैसा व किंमत यांच्या सरासरीच्या तत्वावर अवलंबून असते. या पध्दतीमुळे युनिटची सरासरी किंमत ही सरासरी बाजार मूल्याच्या पेक्षा कमी राहण्यास मदत होते. जर आपली गुंतवणूक सातत्यपूर्ण असेल तरच हे संभव होते. पध्दतशीर गुंतवणुक योजना ही रु. ५०० प्रति महिन्यापासून चालू होवून जास्तीत जास्त रु २५,००० पर्यंत नेता येते. पैसे ECS (ELECTRONIC CLEARING SERVICE) या माध्यमातून भरता येतात.
- वर्षासन : वर्षासन म्हणजे असे करार जे की विमा कंपन्यांकडून विकले जातात व याचे स्वरूप असे असते की, सहसा निवृत्तीनंतर त्या व्यक्तीस ठराविक काळाने पैसे प्राप्त होऊ शकतात.
क्रियाशील मुद्दे – निवृत्तीनंतर तुम्ही कशाप्रकारे तयार असाल?
- उशीरा का होईना सुरुवात करा. जर तुम्ही सुरुवातच केली नाही, तर मग खूपच उशीर होईल.
- तुमच्या निवृत्ती योजनेत व बचत खात्यात त्या सर्व गोष्टी जमा करा ज्या तुमच्या जवळ आहेत.
- खर्चावर नियंत्रण प्राप्त करा व आपली बचत वाढवा.
- जास्त पराताव्यांचा तसेच करात सवलतीचे लक्ष ठेवा. अशा कुठल्याही गोष्टीत गुंतवणूक करू नका ज्यात तुम्ही समाधानी नाही आहात.
- तुमचे लक्ष पडताळून पहा. तुमच्या निवृत्तीच्या काळात तुम्ही कमी खर्चिक प्रकारे जगायला हवे.
- अशी मालमत्ता विका ज्या तुम्हाला उत्पन्न किंवा वृद्धी देत नसतील आणि अशा मालामात्तांमधे गुंतवा ज्यात उत्पन्न जास्त आहे.
- जरी निवृत्तीच्यावेळेस रु. १५ लाख ही पुंजी योग्य वाटत असले, तरी नंतरच्या काळात वाढणाऱ्या महागाईमुळे तुमचे खर्च वाढणार.