दररोज, आठवडय़ातून एकदा, महिन्यातून एकदा, तीन महिन्यांतून एकदा अथवा गुंतवणूकदाराला जो सोयीचा वाटेल तो कालावधी निर्धारित करून एका फंडातून दुसऱ्या फंडात रक्कम गुंतविता येण्याची सुविधा म्युच्युअल फंडात आहे. या संकल्पनेला सिस्टेमॅटिक ट्रान्सफर प्लान अर्थात ‘एसटीपी’ असे म्हटले जाते.

‘एसटीपी’चे मुख्यत: दोन प्रकार आहेत. फिक्स्ड एसटीपी आणि कॅपिटल अ‍ॅप्रिसिएश एसटीपी. पहिल्या प्रकारच्या एसटीपीमध्ये पूर्वनियोजित निश्चित रक्कम, निश्चित दिवशी एका फंडातून दुसऱ्या फंडात गुंतविली जाईल तर कॅपिटल अ‍ॅप्रिसिएश एसटीपीमध्ये मूळ रक्कम तशीच राहून मुद्दलावरील फक्त भांडवली वृद्धी दुसऱ्या फंडात गुंतविली जाते. फिक्स्ड एसटीपीमध्ये लिक्विड किंवा रोखे फंडातून रक्कम इक्विटी फंडात तर कॅपिटल अ‍ॅप्रिसिएश एसटीपीमध्ये काहीसे उलट म्हणजे इक्विटी फंडातील नफा हा रोखे गुंतवणूक असलेल्या फंडात गुंतविला जातो.

शासकीय सेवेतून श्री. प्रमोद मराठे  नुकतेच निवृत्त झाले. त्यांना ४०  लाखांची रक्कम निवृत्ती लाभापोटी मिळाली. मराठे  यांच्या वित्तीय नियोजकाने, निवृत्ती लाभ म्हणून मिळणारी ही रक्कम दीर्घकालीन भांडवली वृद्धीसाठी  इक्विटी फंडात गुंतविण्याचा सल्ला त्यांना दिला. मात्र त्यावेळची बाजार निर्देशांकांची पातळी ही नव्याने इक्विटी फंडात गुंतविण्यास मराठे यांना  योग्य वाटली नाही. . त्यामुळे प्रधान यांनी त्यांच्या वित्तीय नियोजकाला ही रक्कम इक्विटी फंडात टप्प्याटप्प्याने गुंतवावी असे सांगितले. वित्तीय नियोजकाने  संभाव्य पाच इक्विटी फंडांची नावे सांगितली . प्रत्येक फंडात नेमकी किती गुंतवणूक करायची हे ठरल्यानंतर  एक नियोजन आखून देण्यात आले आणि ठरावीक रक्कम  आठवडय़ातून  एकदा लिक्विड फंडातून त्यांनी निश्चित केलेल्या इक्विटी फंडात गुंतविली जाईल, अशी तजवीज केली गेली. त्यापायी बाजाराचा धोका कमी होऊन गुंतवणूक सुरक्षा वाढली . व tax बचत सुद्धा नियोजनबद्ध झाली.

 

अभिप्राय द्या!