शेअर निर्देशांकांची घोडदौड सुरू असताना गुंतवणूकदार म्युच्युअल फंडांतून नफा वसुली करीत आहेत . हा ट्रेंड तात्पुरता आहे. मध्यम कालावधीत घसघशीत परताव्यासाठी इक्विटी म्युच्युअल फंडांच्या योजना सर्वोत्तम पर्याय ठरतील, असा विश्‍वास “डीएसपी ब्लॅकरॉक’ म्युच्युअल फंडाचे फंड व्यवस्थापक अतुल भोळे यांनी व्यक्त केला आहे.

देशात इक्विटी फंड योजनांना नुकताच 20 वर्षे पूर्ण झाली. म्युच्यअल फंडामधील सर्वच इक्विटी लिंक्‍ड योजनांकडे 6 ते 7 लाख कोटींची मालमत्ता आहे.  फंडांची गुंतवणूक प्रक्रिया सुलभ झाली आहे. तुम्ही केव्हाही पैसे काढू शकता. इक्विटीतील पैसे काढण्याचा ओघ वाढवण्यास गुंतवणूकदारांची नफावसुली कारणीभूत आहे. विशेषत: उच्च नेटवर्थ गटातील वैयक्तिक गुंतवणूकदारांनी (एचएनआय) काही फंड योजनांमधील तेजीचा फायदा घेत नफा वसुली केली. त्यामुळे पैसे काढण्याचे प्रमाण वाढल्याचे त्यांनी सांगितले. मात्र हा निधी इक्विटी फंडांमध्ये वाढल्याचे दिसून येते. वर्षभरात इक्विटी फंडांनी सरासरी 20 टक्के परतावा दिला तर डीएसपी ब्लॅकरॉकच्या फंड योजनांनी सुमारे 25 टक्‍के परतावा दिला आहे. देशांतर्गत पूरक घडामोडी लक्षात घेता नजीकच्या काळात बाजारातील तेजी कायम राहील. त्यामुळे नियोजनबद्ध गुंतवणूक योजना (एसआयपी) आणि नियोजनबद्ध हस्तांतर योजना (एसटीपी) मध्यम कालावधीतील गुंतवणुकीवर चांगला परतावा देऊ शकतात असे अतुल भोळे यांनी सांगितले आहे .

अभिप्राय द्या!

Close Menu