पुष्कळ प्रकारचे गुंतवणूक घोटाळे असतात. जे की, तुम्हाला आकर्षित करून कोंडीत पकडू शकतात. त्यामुळे त्यांना टाळणेच योग्य.
- पसरवा आणि फसवा : या प्रकारात तुम्हाला एक इमेल किंवा एसएमएस प्राप्त होईल. ज्यात तुम्हाला म्हणतील कि जीवनातील गुंतवणुकीसाठी सर्वात उत्तम संधी. यात तुम्हाला टी व्यक्ती किंवा कंपनी याबद्दल माहिती नसते. ते कशा प्रकारे स्वतःच्या मोठ्या किमतीचा माल मागे लागून विकताहेत हे ही समजणार नाही. जस जसे गुंतवणूकदार यात फसत जातात त्या कंपनीच्या शेअर किंमती गगनाला भिडतात. एकदा का किंमत सर्वोच्च स्तराला पोहचली की मग घोतालेबाज व्यक्ती त्याचे शेअर विकून मोकळा होतो व त्या शेअरच्या किमती एकदम पडतात. शेवटी तुमच्यापाशी ज्यांची काहीच किंमत उरली नाही असे शेअर्स ठेवण्याशिवाय पर्याय नसतो.
- सापळा : या प्रकारच्या घोटाळ्यात एखादा अनोळखी दूरध्वनी किंवा एसएमएस येतो. त्यात म्हटले असते कि, फलाना कंपनी बाजारात पंजीबध्द होणार आहे. ते असेही म्हणतील कि, एकदा का कंपनी पंजीबध्द झाली म्हणजे त्या कंपनीच्या शेअर किंमती गगनाला भिडतील. कंपनी ज्या क्षेत्रातील असेल ते क्षेत्र बातम्यांमधे चर्चेत राहणार.
- फसवे व पिरॅमिड घोटाळे : अतिशय ठराविक पध्दतीने गुंतवणूकदारांना जाहिराती, इमेल किंवा एसएमएस यांच्याव्दारे आकर्षित करून आश्वासन दिले जाते की, तुम्ही घर बसल्या काम करून रु. १,००० ते २०,००० फक्त सहा आठवडयात कमवू शकता.
R/Sir, I am visit this site .Very usefull and valuable information available on this site. As well as this information available in our mother toung, hence very easy to understand. Please upload the information about intraday .Thanks
thanks
u can think for investment by SIP in equity funds.
that gives good return in 3 to 5 years period