बदलत्या काळानुसार माणसाने अनेक बदल आपल्या जीवनात अंगीकारले आहेत व आपली प्रगती साधली आहे. परंतु, अजूनसुद्धा जेव्हा शेअर बाजारात गुंतवणुकीचा पर्याय येतो, तेव्हा हीच प्रगतिशील माणसे त्याबद्दल अनेक गैरसमज बाळगून असल्याचे दिसते. अर्थात या बाजाराच्या नावाने अनेक चुकीच्या गोष्टी करून फसवणारे महाभाग या गोष्टीस कारणीभूत आहेत, हेही विसरून चालता येत नाही. असे असूनदेखील आपल्या देशातील नागरिकांचा शेअर बाजारातील सहभाग हळूहळू वाढत आहे आणि ते नक्कीच उत्साहवर्धक आहे. कमी होत चाललेले व्याजदर, शेअर बाजाराच्या कामकाजात आलेली पारदर्शकता व बाजाराने इतर गुंतवणूक पर्यायांपेक्षा अधिक दिलेला परतावा (आऊट परफॉर्मन्स) आदी गोष्टी याला कारणीभूत आहे. यामुळे शेअर बाजारातील गुंतवणूक ही आपल्या जीवनातील समृद्धीचा महामार्ग ठरू शकते, फक्त येथे गरज आहे ती संयमाने गुंतवणूक करत राहण्याची आणि कधीही अनावश्‍यक  घाई न करण्याची!

बाजाराची वाटचाल ही कायम अस्थिर असते. त्यामुळे कोणी आपणास “नक्की’, “हमखास’ अथवा “गॅरंटेड रिटर्न’ मिळेल, असे सांगत असेल तर अशा लोकांपासून दूर राहिलेलेच बरे. त्यापेक्षा स्वतः माहिती मिळवून, त्याचा अभ्यास करून आणि प्रसंगी खरोखर तज्ज्ञ वा जाणकार असलेल्या सल्लागाराच्या मदतीने गुंतवणूक करण्यास प्राधान्य द्यायला हवे.नवख्या माणसाने तर SIP णे गुंतवणूक सुरु करावी , तज्ञांचा सल्लाही घ्यावा व सावधानता बाळगावी !!

अभिप्राय द्या!