नव्याने नोकरीस लागलेला निखिल दरमहा रू १२५०० /- LIC पाॅलीसीमध्ये गुंतवतो हे परताव्याच्या दृष्टीने योग्य की अयोग्य ?
कमाईला सुरुवात केल्यापासून नियमित शिस्तबद्ध गुंतवणुकीच्या सवयीची आपल्याकडे वानवा आहे. ‘स्टार्ट अर्ली’ हा मंत्र गुंतवणूक सल्लागार नेहमीच देत असतात. निखिलने नव्याने नोकरीला सुरुवात केली आहे पाहता २६-२७ वय असणार . हे गुंतवणुकीच्या दृष्टीने अगदी सुयोग्य वय आहे. मात्र लक्षात घ्यावयाची अत्यंत महत्त्वाची गोष्ट हीच की, गुंतवणूक आणि विम्याची सांगड घालण्याची गल्लत निखीलकडून झाली आहे. अशी गल्लत करणारे निखीलसारखे अनेक आहेत ही वेदनादायी बाब आहे. पारंपरिकरित्या केवळ कर वजावटीसाठी पगारदार मंडळी काही विचार न करता आयुर्विम्याच्या पॉलिसी घेतात . बचत आणि बरोबरीने विमा संरक्षण आणि कर वजावटही अशा विमा पॉलिसीच्या प्रचारी बाजूला लोक भूलतात. प्रत्यक्षात ‘ट्रिपल बेनिफिट’ वगैरे शब्दप्रयोग वापरणाऱ्या पॉलिसीतून मिळणारा परतावा हा पाच-सहा टक्क्य़ांच्याही घरात जात नाही. शिवाय, विमा हा दीर्घ मुदतीचा करार असल्याने आपला पैसा अनेक वर्षे अशा परतावादृष्टय़ा कमी प्रतीच्या योजनांत अडकला जातो.
ही चूक दुरुस्त करता येते .
या पॉलिसी सरेंडर करता येतील आणि जर आवश्यक किमान कालावधीही पूर्ण होणार नाही इतकेच हप्ते भरले असतील, तर गुंतलेले पैसे अक्कलखाती गेले समजून नुकसान सोसणे केव्हाही परवडते . हे नको असेल तर तीन वर्षांपर्यंत हप्ते भरून थांबा. अशा पेड-अप पॉलिसीत मुदतपूर्तीअंती भरलेल्या हप्त्यांचे त्यावेळी असलेले मूल्य तुम्हाला परत केले जाईल. पॉलिसीच्या पूर्णावधीसाठी हप्ते भरत राहून कमी परतावा मिळविण्यापेक्षा हा पर्याय केव्हाही चांगला ठरेल.
विमा पॉलिसीची सर्वोत्तम ८.५० टक्के दराने परतावा कामगिरी जरी गृहित धरली तरी त्यातून दरमहा २,००० रुपयांप्रमाणे २० वर्षे गुंतवणुकीतून जास्तीत जास्त ९.८ लाख रुपये तुम्ही उभे करू शकाल, त्या उलट म्युच्युअल फंडाच्या समभाग संलग्न योजनेत तितकीच गुंतवणूक सलग २० वर्षे राहिल्यास तुम्ही १९.२ लाख रुपयांचा निधी उभा राहिल.
म्हणून विमा संरक्षणासाठी term plan घ्यावा व equity scheme मध्ये SIP सुरु करणे उचित आहे .
shama joshi
18 Jul 2017विमा संरक्षणासाठी term plan- then what is the minimum duration for term plan?
Pradeep Joshi
18 Jul 2017टर्म plan चा हप्ता दरवर्षी भारता येतो किंवा दहा ते वीस वर्षे मुदतीचा एकत्रित हप्ताही भरता येतो
हप्त्यापायी भरलेल्या रकमेतून काहीही लाभ होत नाही.पण अत्यंत कमी किमतीत ५० लाखापेक्षा जास्त रकमेचे संरक्षण मिळते