आज विम्बल्डन स्पर्धेमध्ये पुरुष एकेरीचा अंतिम सामना आहे . धनलाभच्या  संकेतस्थळावर विम्बल्डन कसे काय ? हा प्रश्न सर्वांच्या मनात आला असेल ना ?

अत्यंत चुरशीने दरवर्षी खेळल्या जाणाऱ्या या स्पर्धांमध्ये भली मोठी बक्षिसांची रक्कम हाही एक आकर्षणाचा मुद्दा असतोच.

बोरिस बेकर हा सहा वेळा विम्बल्डन स्पर्धा जिंकणारा त्यावेळचा अत्यंत धनवान खेळाडू आहे . वेगवेगळ्या देशातील स्पर्धातून भाग घेताना तो स्वतःच्या विमानाने जात असे.!! गेल्या बुधवारी त्याच्यासंबंधी एक बातमी वाचनात आली . त्याच्या देशातील कोर्टाने त्याला दिवाळखोर म्हणून जाहीर केले आहे , ही ती बातमी, कि ज्यामुळे विम्बल्डन धनलाभ च्या संकेतस्थळावर येऊ शकले !!

मिळालेल्या संपत्तीचा दुरुपयोग / mismangement केल्याने अतिश्रीमंत खेळाडूला दिवाळखोर म्हणून घेण्याची पाळी आली. म्हणून  तरुणांनी कायम ” success is never permanent . Plan well when the sun is shining coz failing to plan is planning to fail “  हे कायमस्वरूपी ध्यानात ठेवणे महत्वाचे आहे .

 

This Post Has 2 Comments

  1. shama

    Awesome connection with Wimbledon ?

    1. Pradeep Joshi

      thanks

अभिप्राय द्या!