म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक सुरु करण्यापूर्वी हे वाचाच !!

फंड किती मोठा आहे हे तपासावं. अगदी छोटे फंड टाळावेत.

  • फंडाचा खर्च किती टक्के आहे हे बघून घ्यावं. रेग्युलर प्लान हा डायरेक्ट प्लानपेक्षा खर्चीक असतो. परंतु जर आपल्याला नेटवरचे व्यवहार कळत नसतील तर म्युचुअल फंड डिस्ट्रिब्युटरकडून रेग्युलर प्लानमध्ये गुंतवणूक करावी.

  • गुंतवणूक करण्यापूर्वी एक्झिट लोड समजून घ्यावा. लिक्विड फंडातून पैसे काढताना एक्झिट लोड लागत नाही.

*  फंडाचे परतावे हे दीर्घकाळावर तपासावे. फक्त एक वर्षांचे परतावे बघून निर्णय घेऊ नये.

  • फंडाची जोखीम तपासून घ्यावी : प्रत्येक फंडाचा बीटा नेटवर दाखवण्यात येतो. १ पेक्षा जास्त बीटा असणारा फंड जास्त जोखमीचा असतो आणि कमी जोखीम असणाऱ्या फंडाचा बीटा १ पेक्षा कमी असतो.

*  कोणत्याही फंडात गुंतवणूक करताना त्यावर कर कधी आणि किती लागतो हे जाणून घ्यावं. त्यानुसार गुंतवणूक करून, कर आणि परताव्याचे समीकरण सांभाळावे.

 *  एका पोर्टफोलिओमध्ये ५-६ फंड पुरे.

 

  • केलेली गुंतवणूक व्यवस्थित परतावे देत आहे की नाही हे वेळोवेळी तपासून घ्यावं. जर परतावे कमी होत असताना दिसले तर त्या मागचं कारण शोधून मग पुढे गुंतवणूक चालू ठेवायची की बदलायची हा निर्णय घ्यावा.

अभिप्राय द्या!