अधिक वैशिष्ठे असलेले उत्पादन किंवा योजना सर्वात चांगली असते, असा सर्वसाधारण समाज आहे. उत्पादन मग ते स्मार्टफोन अॅप्लिकेशन (अॅप) असो, पिझ्झा असो किंवा तुमच्या मुलांसाठीचे प्लेस्कूल असो; जेवढे विविध लाभ अधिक तेवढी ती चांगली असा दृढ समाज आहे. हाच समाज आर्थिक योजनांच्या बाबतीतही असतो, ही बाब काहीशी चिंताजनक आहे. गुंतवणुकीचा योग्य निर्णय घेण्यासाठी सर्व बाबी अत्यंत सोप्या असणे आवश्यक असते.

बचतीच्या योजनांबाबत विचार केल्यास, त्यंचा साधेपणा हे केवळ महत्वाचे लक्षण ठरते असे नव्हे; तर ते सर्वथा गरजेचेही असते. गुंतवणूकदाराला एखादी आर्थिक सेवा किंवा एखादी आर्थिक योजना पूर्णपणे कळलीच नाही, तर मग समस्या निर्माण होतात. अशी समाज गुंतागुंतीच्या आर्थिक योजनांच्या बाबतीत येत नाही किंवा येऊ शकत नाही.

गुंतवणुकीची प्रक्रिया कधीच गुंतवणुकीने होत नाही; ती सुरु होते वास्तविक उदिष्टे ठरवून. काहीवेळा गुंतवणूकदाराने गुंतवणुकीला सुरुवात केली असता आणि त्याला त्यातून दरमहिना १० हजार रुपये पाच वर्षासाठी हवे असतात तसेच ही रक्कम या कालावधीत  १५ लाख रुपये व्हायला हवी असते. कोणाला कितीही पैशाची गरज असली तरी, हे होणे शक्य नाही. प्रत्येकाच्या भविष्यात काय होणार आहे याचा अंदाज कोणालाच बांधता येत नाही. तरीही केव्हा किती पैसे लागणार आहे याचा अंदाज प्रत्येकाने घेणे अधिक सोयीस्कर असते. मुलांचे शिक्षण व निवृत्ती या दोन गोष्टी त्यातल्या त्यात आधी ठरवता येतात.

या सर्व उद्दिष्टांना डोळ्यासमोर ठेवून, ही उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी प्रत्येकाला बचत करावीच लागते. ही बचत आपोआपच करणे हा एक यासाठी मार्ग असू शकतो. याचे उत्तम उदाहरण म्हणजे म्युचूअल फंडांची एसआयपी होय. एसआयपींमधे दरमहिना ठराविक रक्कम गुंतवली जाते. बँक खात्यातून होणारी किंवा धनादेशाने होणारी ही अनिवार्य गुंतवणूक असते. एसआयपीचे अनेक फायदे असले तरी, यात एकदा गुंतवणूकीला सुरुवात केली की मुदतीपर्यंत सुरूच राहते. जे गुंतवणूकदार नियमित गुंतवणूक करत नाहीत, त्यांना एसआयपीने गुंतवणूक हे एक ओझे वाटू शकते.

यानंतर एक प्रश्न निर्माण होतो, किती रक्कम गुंतवावी? इथे साधेपणाचा मंत्र कामी येतो. तुम्हाला येत्या पाच किंवा सात वर्षात आवश्यकता भासेल इतका पैसा तुम्ही debt मधे गुंतवा आणि उरलेली रक्कम इक्विटीमध्ये गुंतवा. अनेकजण खूप गुंतागुंतीची रचना करून अॅसेट अॅलोकेशन करतात. परंतु असा सोपा, सहज समजण्याजोगा दृष्टीकोन बाळगल्यास गुंतवणूक सोपी होऊन जाते. वेगवेगळे गुंतवणूक पोर्टफोलिओ लोक जेव्हा तयार करतात, तेव्हा त्यांना गुंतवणुकीचे किमान प्लॅनिंग करणे तसेच गुंतवणुकीचा आवश्यक तेवढाच धडाका लावणे गरजेचे असते.

प्रभावी गुंतवणुकीसाठी दोन किंवा तीन म्युचुअल फंड निवडा, ज्यांचा इतिहास चांगला असेल; अशा म्युच्युअल फंडाशीच प्रामाणिक रहा. बाकी सारे त्या फंडाच्या गुंतवणूक व्यवस्थापकावर सोडा. यापेक्षा अधिक गुंतवणुकीची साधने आपल्याला खरोखरच लागत नाही. अशा योजनांमधे सर्वाकाही समजण्यास सोपे असते, त्याचा मागोवा घेणेही सहज शक्य असते. तुम्हाला यामधे कशाप्रकारे गुंतवणुकीत वृध्दी अथवा घट होते आहे ते स्पष्ट दिसू शकते. अशा गुंतवणुका तुमच्या वाटचालीवरही चांगला परिणाम करतात. त्याउलट, गुंतागुंतीच्या योजना घेतल्यास, त्यांचा मागोवा घेणे जिकीरीचे होऊन बसते. त्यामुळे सोप्या कल्पना, सोप्या योजना केव्हाही फायद्याच्या असतात, यात काहीच शंका नाही.

अभिप्राय द्या!