प्रकाशचा मित्र दिनेश हा त्याच्या घरी आपल्या नव्या योजनेबाबत माहिती देण्यासाठी आला .पण प्रकाशची पत्नी मिथिला ही धनलाभ कडून बरीच माहिती घेवून आल्याने त्या तिघातील संवाद पहा !!

 

‘अरे मी तुला सांगतो, हा बेस्ट प्लान आहे तुझ्या रिटायरमेंटसाठी’– दिनेश उत्साहात सांगत होता.

‘एक मिनिट दिनेश, अरे आत्ताचं बोल आधी, साठीनंतरच काय करायचं?’- मिथिला  मधेच म्हणाली.

‘म्हणजे? अगं मी इन्शुरन्सच्या स्कीमबद्दल बोलतोय’- दिनेशने गोंधळून सांगितलं. दिनेश म्हणजे मिथीलाच्या  नवऱ्याचा लहानपणापासूनचा एक चांगला मित्र. नुकतीच त्याने बँकेतील नोकरी सोडून स्वतःची एजन्सी चालू केली होती. तो बँकेत लागला तेव्हा त्याने पहिलं अकाऊंट प्रकाशचे  उघडले होते , त्यामुळे साहजिकच आता प्रकाशची  पहिली पॉलिसी घ्यावी म्हणून तो  आला होता.

‘मला कळलं रे, मीही तेच बोलतेय. इन्शुरन्सची खरी गरज आता असते तिशीत आणि चाळीशीत’. मिथिला

आता दिनेश साफच गोंधळाला. एकतर हे विषय सुरु झाले की सहसा स्वयंपाकघरात जाणारी मिथिला  आज चक्क ठाण मांडून बसली होती.

‘बाबारे, धनलाभ कडे  जायला लागल्यापासून माझा पैशांचा सगळा व्यवहार हीच बघते. तेव्हा तू हिलाच समाजाव काय ते’- असं कौतुकाने सांगत प्रकाशनेसुद्धा हात वर केले.

मी आणि प्रकाश आत्ता तिशीत आहोत. आजच्या घडीला जेमतेम दहा वर्ष नोकरी करून आमच्याकडे मोठी पुंजी नाही. पुन्हा अदिती लहान असल्यामुळे तिचं तिनं पाहायला हवं हा मुद्दाच येत नाही. त्यामुळे आज आम्हाला किंवा आमच्यातल्या एकाला काही झाल तर अदितीचं किंवा दुसऱ्याच काय होईल ही खरी काळजी आहे.’ मिथिला

‘अरे पण म्हणजे तुला रिटायरमेंटची काही काळजीच नाही?’ दिनेश

‘कशाला करायची? अरे तीस पस्तीस वर्ष काम केल्यावर आता आमचं काय होणार अशी काळजी करण्याची वेळ येत असेल तर संपलच म्हणायचं सगळं.’ मिथिला 

‘मी तुला सांगू, मुळात ही कल्पना अमेरिकन आहे, त्यांच्याकडे बचत ही गोष्टच नाही. सगळे संसार लठ्ठ क्रेडिट कार्डांवर. आपलं स्वतःच घर असाव या इच्छेवरही आपल्यासारखं त्यांचं प्रेम नाही, असलं तर असलं नाहीतर कॉण्डो/ट्रेलर किंवा वृद्धाश्रम.’ मिथिला

, रिटायरमेंटनंतरच्या सोयीचे त्यांना हे फार कौतुक! आपल्याकडे तसं नाही. आपल्याकडचे सज्जन/बालबच्चेवाले आईबाप रिटायर होतात तोपर्यंत एक काय दोन दोन घरं असतात  फंडबिंड नाही तर एफडी तर असतातच, त्यात थोडी शेअर्सची हौस असेल तर तिथे काही पैसे असतात. तेव्हा कशाला पाहिजे इन्शुरन्सचं घबाड?  मिथिला 

‘अगं पण मी सांगतोय ती स्कीम घेतलीस तर आतासुद्धा कव्हर आहेच की.’ दिनेश

‘असं म्हणतोस, किती आहे सांग कव्हर?’ मिथिला

‘हे बघ, दर वर्षाला फक्त ७५००० रुपये द्यायचेत. म्हणजे समजा तुम्ही दोघांनी दिवसाला फक्त १०० रुपये वेगळे काढायचे आणि पंचवीस वर्षांनी तुम्हाला २५ लाख रुपयांचा सुरक्षित फंड. पुन्हा मधली वर्ष १५ लाखांचं कव्हर आहेच!’   दिनेश

‘अरे बाबा १५ लाखांत काय होणार सांग आजच्या जमान्यात?’ मिथिला

‘हो गं, पण शिवाय मॅच्युरीटीचे फायदे आहेतच ना.’  दिनेश

‘थांब, मी तुला आता अजून एक गणित देते. समजा मी तुझ्या ७५००० रुपयातले दरमहा ५०००० रुपये टाकले सरकारच्या पीपीएफमध्ये तरी मला पंचवीस वर्षांनी चाळीस लाख रुपयांच्या जवळपास रक्कम मिळेल. म्हणजे तुझ्यापेक्षा जास्तच आणि उरलेल्या उरलेल्या पंचवीस हजारांचा मी टर्म प्लॅन घेईन. त्यातून मला सहज पन्नास लाख कव्हर मिळेल. म्हणजे तेही तुझ्यापेक्षा जास्तच’   मिथिला

हा युक्तिवाद बिनतोड होता. मग थोडा वेळ समजवायचा प्रयत्न करून शेवटी कंटाळून दिनेश निघून गेला.

‘हा टर्म प्लॅन काय आहे गं?’- आवरता आवरता प्रकाशने विचारलं.

‘अरे, टर्म प्लॅन म्हणजे ज्यात आपले इन्शुरन्सचे पैसे परत मिळत नाहीत ते. स्कूटी नाहीतर कारच्या इन्शुरन्ससारखा. त्यामुळे काय होत सगळं प्रीमियम हा संकट काळाच्या तरतुदीट जातो. आपल्यासाठी तो गुंतवणूक नाही तर सुरक्षेसाठीची ढाल बनते. परत पैसे द्यायचे नसतील तर कंपनीही जास्त कव्हर देऊ शकते.’ मिथिला

तू नसतीस तर मी घेऊन मोकळा झालो असतो त्याचा प्लान!!  प्रकाश

‘अरे, अशा योजनेत कंपनीची स्वतःची मार्जिन कमी असते. मग ते एजंटला कमिशनही कमी देतात. त्यामुळे एजंट टर्म plan बद्दल काही सांगत नाहीत.

म्हणून वेगवेगळ्या योजनांची माहिती धनलाभ सारख्या सल्लागाराकडून घेवूनच आपली गुंतवणूक करायला शिकले पाहिजे !!

 

अभिप्राय द्या!