सोने व रिअल इस्टेटमधील मंदावलेले भाव आणि खाली येणारे व्याजदर यामुळे गुंतवणूकदार इक्विटी व म्युच्युअल फंडाकडे आकर्षित होत आहेत. म्युच्युअल फंड उद्योगाने गुंतवणूकदारांना त्यांच्या गरज, अपेक्षा व जोखीम (रिस्क) घेण्याच्या तयारीप्रमाणे अनेक योजना आणलेल्या आहेत. या फंडांचे आपण दोन प्रकारांत वर्णन करू शकतो-
इक्विटी आणि डेट फंड.
कोणत्याही फंडामध्ये दोन पद्धतीने गुंतवणूक करता येते- एकरकमी आणि सिस्टीमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (एसआयपी). .
आपले वय , जोखीम घ्याची तयारी ,यावर कोणता फंड निवडावा हे थोडक्यात पहा !!
फंड प्रकार 1) कमी जोखीम ः प्रथमच गुंतवणूक करणारे, ज्येष्ठ नागरिक, मुदत ठेवींसारखा (एफडी) सुरक्षित परतावा अपेक्षिणाऱ्यांसाठी योग्य.
अ) इक्विटी सेविंग्ज स्कीम ः गुंतवणूक 3 ते 5 वर्षे.
ब) बॅलन्स्ड फंड ः गुंतवणूक 5 ते 10 वर्षे, (मासिक, नियमित उत्पन्नासाठी चांगला).
फंड प्रकार 2) मध्यम जोखीम ः वय 50 पर्यंतची व्यक्ती, प्रथमच गुंतवणूक करणारे, मध्यम जोखीम पत्करण्याची तयारी, उद्दिष्टानुसार गुंतवणूक करणारी व्यक्ती.
अ) लार्ज कॅप फंड ः गुंतवणूक 5 ते 10 वर्षे.
ब) डायव्हर्सिफाइड इक्विटी फंड ः गुंतवणूक 7 ते 10 वर्षे.
फंड प्रकार 3) उच्च जोखीम वय 40 पर्यंतची व्यक्ती, प्रथमच गुंतवणूक करणारे, अधिक जोखीम पत्करण्याची तयारी, उद्दिष्टानुसार गुंतवणूक करणारी व्यक्ती, थेट इक्विटी गुंतवणूकदार.
अ) मिड कॅप फंड ः गुंतवणूक 7 ते 10 वर्षे. हा फंड “ऍग्रेसिव्ह’ असल्याने पोर्टफोलिओच्या 20 टक्क्यांपेक्षा जास्त गुंतवणूक यात नसावी. “एसआयपी’ करणे योग्य.
ब) स्मॉल कॅप फंड ः गुंतवणूक 7 ते 10 वर्षे.
फंड प्रकार 4) ऍग्रेसिव्ह रिस्क वय 40 पर्यंतची व्यक्ती, थेट इक्विटी गुंतवणूकदार, ज्यांना सेक्टरची व्यवस्थित माहिती आहे. (प्रथमच गुंतवणूक करणाऱ्यांनी या फंडात गुंतवणूक करू नये.)
अ) थिमॅटिक फंड ः गुंतवणूक 7 ते 10 वर्षे.
ब) सेक्टोरल फंड ः “सेक्टर सायकल’वर गुंतवणूक कालावधी अवलंबून. फंड ऍलोकेशन-
फंड प्रकार 5) टॅक्स सेव्हिंग ः करबचतीसाठी उपयोगी, पीपीएफ गुंतवणूकदार, रिटायरमेंट प्लॅनिंग, तीन वर्षे लॉक-इन-पिरियड.
अ) इएलएसएस फंड ः गुंतवणूक 5 वर्षे,कलम 80 सी अंतर्गत 1.50 लाख रुपयांची करबचत.