मोदी सरकारने ज्येष्ठ नागरिकांसाठी एका पेन्शन योजनेची घोषणा केली आहे. केंद्र सरकारने 60 अधिक वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘प्रधानमंत्री वय वंदना योजना’ या नावाने निर्वाह योजना सुरू केली आहे. सार्वजनिक क्षेत्रातील आयुर्विमा महामंडळ अर्थात एलआयसीमार्फत या योजनेमध्ये ज्येष्ठ नागरिकांना सहभागी होता येणार आहे. एलआयसीमार्फत ऑफलाइन आणि ऑनलाइन अशा दोन्ही पद्धतीने या योजनेत सहभागी होता येईल. 60 वर्षांहून अधिक वयाच्या कोणत्याही व्यक्तीला या योजनेत भाग घेता येणार आहे.

कशी आहे योजना?
‘प्रधानमंत्री व्यय वंदना योजने’अंतर्गत प्रत्येक महिन्याला 5 हजार रूपये म्हणजेच वर्षाला कमाल 60 हजार रूपये पेन्शन मिळणार आहे. मात्र 60 हजार पेन्शनसाठी एकरकमी 7 लाख 22 हजार 890 रूपये जमा करावे लागणार आहेत. या योजनेअंतर्गत महिन्याला किमान 1 हजार रुपये म्हणजेच वर्षाला 12 हजार रूपये मिळतील. त्यासाठी ज्येष्ठ नागरिकांना 1 लाख 44 हजार 578 रूपये जमा भरावे लागतील. एकदा पेन्शन योजना खरेदी केल्यानंतर पुढील 10 वर्षांपर्यंत पेन्शन घेता येऊ शकते. म्हणजेच ही योजना फक्त 10 वर्षांसाठी असेल.

अभिप्राय द्या!