महिंद्र म्युच्युअल फंड कर बचत योजना घ्या व कर वाचवा

करदाते या वर्षीच्या कर नियोजनासाठी टॅक्स सेव्हिंग फंडांचा नक्कीच विचार करतील या अपेक्षेने ईएलएसएस फंड गटातील ही नवी योजना पहा

महिंद्र म्युच्युअल फंडाची पहिली योजना असलेल्या महिंद्र लिक्विड फंडाला आत्ताच एक वर्ष पूर्ण झाले. भारतातील ४२ म्युच्युअल फंडात पहिल्या वर्षांत मालमत्तेत २,५०० कोटींचा टप्पा गाठणारा महिंद्र म्युच्युअल फंड हा एकमेव म्युच्युअल फंड आहे.

फंडाची सर्वाधिक गुंतवणूक बँकिंग, वाहन निर्माते, वाहन उद्योगासाठी पूरक उत्पादनांचे निर्माते, तेल व वायूक्षेत्र, ग्राहकोपयोगी वस्तू या उद्योगक्षेत्रात आणि रोकडसुलभ रोखे गुंतवणुका आहेत. मारुती सुझुकी, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, स्टेट बँक व इन्फोसिस या पाच कंपन्यांत फंडाने सर्वाधिक गुंतवणूक केली आहे. ईएलएसएस योजनांतील गुंतवणूक गुंतवणूकदारांना तीन वर्षे काढता येत नाहीत.

बहुसंख्य करदाते व्यावसायिक कर सल्लागारांचे मार्गदर्शन अभावानेच घेतात. एखादी व्यक्ती बँकेत मुदत ठेवी करीत असेल तर मुदत ठेवींवर मिळणाऱ्या व्याज त्या गुंतवणूकदाराच्या अन्य उत्पन्नात धरून एकूण उत्पन्नावर आयकर आकारणी होते. हीच बचत त्या व्यक्तीने तीन वर्षे रोखे गुंतवणूक करणाऱ्या म्युच्युअल फंडात किंवा एका वर्षांसाठी आर्ब्रिटाज फंड किंवा इक्विटी सेव्हिंग्ज फंडात गुंतविली तर तर ही गुंतवणूक कर कार्यक्षम ठरते. वैयक्तिक करदाते कर वजावटीसाठी उपलब्ध पर्यायांपैकी पीपीएफ व विम्याचा हप्ता सर्वाधिक पसंत करतात. एक वेळ मुदतीचा विमा खरेदी केल्यामुळे किमान पुरेसे विमा कवच घेतल्याने कुटुंबाला सुरक्षा मिळते. विमा व बचत एकत्रित असलेल्या विमा योजना ना पुरेसे विमा संरक्षण देतात ना या योजनांवर मिळणारा परतावा महागाईच्या दराहून कमीच असतो.  यासाठी तज्ज्ञ सल्लागार हे मुदतीचा विमा व म्युच्युअल अर्थात कर वजावटीस पात्र असलेल्या ईएलएसएस फंडात गुंतवणूक करण्याचा सल्ला देतात.

मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकाने ३२ हजाराचे शिखर गाठलेले असताना हा फंड उत्तम परतावा देणाऱ्या पहिल्या पाच फंडांत दिसला नाही तरी हा फंड परताव्यात सातत्य राखणारा व सरासरीहून अधिक परतावा देणाराआहे  हे नक्की !!

अभिप्राय द्या!