म्युच्युअल फंड खरेदी करताना सल्लागाराचा सल्ला घेतानाच आपण निवडलेल्या फंडाचे रेटिंग सुद्धा नेटवर पाहू शकतो.पण केवळ उच्च स्टार पाहून फंड खरेदी केल्यास थोडेफार नुकसानही होऊ शकते. वानगीदाखल काही मोजक्या फंडांचे रेटिंग सोबतच्या तक्त्यात दिले आहे ते पहा .
Multiple Ratings That Leave You Bamboozled
तक्ता पाहिल्यावर एकाच फंडाला वेगवेगळ्या रेटिंग agency नि थोडेफार भिन्न रेटिंग दिले आहे हे लक्षात येते. व ही भिन्नता का ? असाही प्रश्न मनात येतो.रेटिंग देताना कोणते parameter लक्षात घेवून व त्यांना किती weightage दिले आहे त्यावर रेटिंग मध्ये येणारी तफावत अवलंबून असते. तसेच फंड manager गुंतवणूक करताना किती धोका पत्करतो त्यावर सुद्धा रेटिंग मध्ये भिन्नता येवू शकते.
फंडाची एकूण मालमत्ता,व्यवस्थापन ,गुंतवणुकीची पद्धत, फंड manager किती फंडांचे व्यस्थापन करीत आहे त्यावरही रेटिंगमध्ये फरक राहू शकतो .तथापि खूप भिन्नता असलेल्या फंडात सावधानता बाळगत गुंतवणूक करणे हिताचे आहे.