श्रावण महिना हा व्रत वैकल्यांचा महिना असतो . या महिन्यात कोणतेही शुभ कर्म सुरु केल्यास त्याचा चांगला लाभ होतो असे म्हणतात .सध्या शेअर बाजार हा उच्चतम पातळीवर असल्याने अनेकजण गुंतवणूक सुरु करू का ? हा प्रश्न विचारतात . फक्त एकरकमी गुंतवणूकीऐवजी दरमहा ठराविक गुंतवणूक (SIP ) करणे अत्यंत हितावह आहे. व नवख्यांनी या पद्धतीने म्युच्युअल फंडामध्ये प्रवेश करावा हा सल्ला !!

 

“एसआयपी’मध्ये दरमहा किती रक्कम गुंतवावी?
अशी रक्कम सांगणे अवघड आहे. कारण “एसआयपी’ची रक्कम प्रत्येक गुंतवणूकदाराच्या आर्थिक परिस्थितीवर अवलंबून असते. आपले दर महिन्याचे खर्च भागवून उरलेल्या रकमेपैकी काही हिस्सा “एसआयपी’मध्ये गुंतवावा. याशिवाय आपले भविष्यातील उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवूनदेखील आपण “एसआयपी’ची रक्कम ठरवू शकतो. उदाहरणार्थ, म्युच्यअल फंडातील गुंतवणुकीवर पंधरा टक्के वार्षिक परतावा अपेक्षित धरून पंधरा वर्षांनंतर एक कोटी रुपये मिळविण्याचे उद्दिष्ट असलेल्या व्यक्तीने दरमहा साधारणतः पंधरा हजार रुपये हे चांगली कामगिरी करणाऱ्या योजनेत नियमितपणे पंधरा वर्षे गुंतवावेत.

 “एसआयपी’ सुरू केल्यानंतर बाजार कोसळल्यास गुंतवणुकीमध्ये तोटा दिसतो, अशा वेळी काय करावे?
असा तोटा हा फक्त कागदावर दिसणारा तोटा असतो, त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करावे आणि अशा परिस्थितीस गुंतवणुकीची संधी मानून, शक्‍य असल्यास थोडी अधिक गुंतवणूक करावी. अर्थात, त्यापूर्वी आपण निवडलेला फंड हा चांगला असल्याची खातरजमा तज्ज्ञ व्यक्तीकडून करून घ्यावी.

 गेल्या काही वर्षांतील शेअर बाजारातील तेजी येणाऱ्या काळातही तशीच सुरू राहील का?
“एसआयपी’द्वारे गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदाराने या प्रश्नाचा विचारदेखील करू नये. याउलट अधून-मधून गटांगळ्या खाणारा बाजारच स्वस्तात खरेदीची संधी निर्माण करतो, हे विसरू नये. बाजार कोणत्याही दिशेने गेला तरी गुंतवणुकीतील नियमितता सोडू नये.

यादृष्टीने UTI Mastershare , Tata Balanced fund, HDFC top 200 हे खुले फंड चांगले आहेत !!

अभिप्राय द्या!