आयपीओ खरेदी करावयाचे असल्यास अर्ज भरणे आवश्यक आहे.
हा अर्ज सामान्यत: शेअर ब्रोकर, लिड मॅनेजर, सिंडिकेट सदस्य आणि कलेक्टींग बँककडून उपलब्ध होऊ शकतो. अर्ज, चेक/डिमांड ड्राफ्ट आयपीओ च्या कलेक्टींग बँकेमध्ये (नाव व पत्ते अर्जावर छापलेले असतात) त्यांच्याकडे जमा करणे आवश्यक आहे. अपूर्ण/अयोग्य अर्ज नाकारले जाऊ शकतात.
आयपीओ खरेदीसाठी डिमॅट अकाऊंट असणे आवश्यक आहे. हे कोणत्याही मान्यताप्राप्त DP कडे असले तरीही चालते. कोणत्याही प्रकारच्या गुंतवणूकदारास अर्जासोबत १०० % रक्कम(MARGIN) मार्जिन म्हणून भरावीच लागते.
आयपीओची विक्री पूर्वनियोजित कालावधीत केली जाते आणि त्यानंतर ठराविक दिवशी त्याचे allotment केले जाते. खरेदी करणाऱ्याचे बँक खाते ASBA (Application Supported by Blocked Amount) या स्वरूपाचे असणे बंधनकारक आहे.
सध्याच्या नियमानुसार, १ वर्षांहून अधिक काळासाठी केलेल्या आयपीओमधील गुंतवणूक भांडवली लाभासाठी करमुक्त आहे. प्रस्ताव दस्ताऐवजच्या दिलेल्या घटकांवर आधारित, गुंतवणूकदाराने स्वत: माहितीपूर्वक निर्णय घेतला पाहिजे.
सेबी स्वत: कोणत्याही कंपनीशी निरपेक्षपणे जोडलेली असते म्हणून गुंतवणूकदाराने कंपनीच्या व्यवसायाचा सविस्तर अभ्यास करूनच गुंतवणूक करणे अपेक्षित आहे.
माहिती उघड करणारे कागदपत्र (डिसक्लोजर्स) / प्रस्ताव लेख (ऑफर डॉक्युमेंटस्) संपूर्ण आयपीओबद्दल माहिती देणारे असतात म्हणून गुंतवणूकदाराने त्याचा काळजीपूर्वक अभ्यास करणे महत्वाचे ठरते.
सेबी आयपीओचे मुल्य ठरवण्यामध्ये कोणतीच भूमिका बजावत नाही. कंपनीने प्रस्ताव पत्रात ठरविलेल्या मुल्याचे सखोल स्पष्टीकरण दिलेले असते. यामध्ये किंमतीच्या गुणात्मक व परिमाणवाचक घटकांची माहिती दिलेली असते याची गुंतवणूकदाराने विशेषत: नोंद घ्यावी.