रिझव्‍‌र्ह बँकेने बुधवारी रेपो दरात केलेल्या पाव टक्का कपातीने घर अथवा वाहनासाठी कर्ज घेऊ इच्छिणाऱ्यांना दिलासा मिळण्याबाबत स्पष्टता नसली तरी बँकांमध्ये मुदत ठेवी करणाऱ्यांना मात्र कठीण काळ अपरिहार्य दिसून येतो. सेवानिवृत्तीचा लाभ बँकांमध्ये ठेवरूपात ठेवणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि अन्य गुंतवणूकदारांना याचा मोठा फटका बसणार आहे.

बँकिंग अग्रणी भारतीय स्टेट बँकेने रिझव्‍‌र्ह बँकेचे पतधोरण जाहीर होण्यापूर्वीच सोमवारी आपल्या बचत खात्यावरील व्याज दरात कपात केली. खात्यात एक कोटी रुपयांपेक्षा कमी शिल्लक असणाऱ्या खातेदारांना यापुढे चार टक्क्यांऐवजी ३.५ टक्के व्याज दर देण्याचा निर्णय बँकेने घेतला. गेल्या सहा वर्षांतील बँकेने बचत खातेदारांना देऊ केलेला हा सर्वात कमी व्याजाचा दर असून, तिच्या ९० टक्के खातेदारांना याचा फटका बसणार आहे.

मुदत ठेवींबाबत सध्या बहुतांश बँकांकडून वार्षिक ६.७५ टक्क्यांचा व्याज दर दिला जातो. अधिक मुदतीच्या ठेवींवर तर यापेक्षाही कमी व्याज दर बँका देतात. रिझव्‍‌र्ह बँकेच्या रेपो दर कपातीने या तुटपुंज्या व्याज दरातही बँकांकडून लवकरच कपात केली जाईल. ज्येष्ठ नागरिकांच्या ठेवींसाठी बहुतांश बँका पाव ते अर्धा टक्का वाढीव व्याज दर देत असल्या तरी, बँक ठेवींवरील लाभ हा करपात्र असल्याने प्रत्यक्षात परतावा दर हा पाच टक्क्यांच्या आसपास राहतो. याच पातळीवर चलनवाढीचा दरही असल्याने प्रत्यक्षात ठेवींवरील परतावा दर शून्यच होतो.

या परिस्थितीमध्ये निव्वळ व्याज हेच उत्पन्न असलेल्या व्यक्तींनी SWP चा पर्याय कसा बहुउद्देशीय फायदेशीर आहे हे समजून घेवून आपला योग्य पर्याय निवडावा असे आवाहन धनलाभतर्फे करण्यात येत आहे .

 

अभिप्राय द्या!