भारत सरकार सार्वजनिक क्षेत्रातील चार कंपन्यांमधील हिस्सा विक्री करण्याचा विचार करत आहे. संरक्षण विभागाच्या नियंत्रणाखाली असलेल्या कंपन्यांमधील 25 टक्के हिस्सेदारी प्राथमिक समभाग विक्रीद्वारे (आयपीओ) विकण्याची योजना आहे.

भारत सरकार सार्वजनिक क्षेत्रातील माजागॉन डॉक लिमिटेड, भारत डायनामिक्स लिमिटेड, गार्डन रीच शिपबिल्डर अँड इंजिनियरिंग लिमिटेड आणि मिश्रा धातू निगम लि. या चार कंपन्यांचा त्यात समावेश आहे.

तसेच महिंद्र लॉजिस्टिक्स लिमिटेडने प्राथमिक समभाग विक्रीसाठी (आयपीओ) सेबीकडे अर्ज केला आहे. महिंद्र लॉजिस्टिक्स ही आघाडीची ऑटोमोबाइल कंपनी असलेल्या महिंद्र अॅण्ड महिंद्रची उपकंपनी आहे.

अभिप्राय द्या!