केंद्र सरकारने गेल्यामहिन्यात एकापेक्षा अधिक पॅन कार्ड वापरुन करचुकवेगिरी करणाऱ्यांची तब्बल 11.44 लाख पॅन कार्ड सरकारने निष्क्रिय केली आहेत. सरकारकडून निष्क्रिय करण्यात आलेल्या पॅनकार्डमध्ये आपले पॅनकार्ड नाही ना? असा प्रश्न आपल्याला पडला असेल तर आपण आपले पॅनकार्ड फेक पॅनकार्डच्या यादीत नाही ना हे तपासून घ्या

तपासण्याची पद्धत

1.आपल्याला प्राप्तिकर विभागाच्या ई-फायलिंगच्या संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल.
2. www.incometaxindiaefiling.gov.in या संकेतस्थळावरील होम पेजवर ‘सर्व्हिसेस’ या मथळ्याखाली ‘नो युवर पॅन’ असा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.
3.एक नवीन पेज ओपन होईल. यामध्ये आपले नाव, धर्म, स्टेटस यांसारखी माहिती भरुन द्यावी लागणार आहे. शिवाय ज्यावेळी पॅनकार्डचा फॉर्म भरला त्यावेळी जो नंबर दिला होता तोच हा नंबर आहे की नाही याची खात्री करून घ्यावी लागले.
4. सर्व माहिती भरल्यानंतर ‘सबमिट’वर क्लिक करा
5.आपल्या रजिस्टर मोबाईल क्रमांकावर ओटीपी (वन टाईम पासवर्ड) येईल.
6.ओटीपी टाकल्यानंतर व्हॅलिडेट या बटणावर क्लिक करा.
7.एकाहून अधिक पॅनक्रमांक आपल्या माहितीवर रजिस्टर केलेले असतील तर नावावर एकाहून अधिक पॅनकार्ड असून जास्तीची माहिती द्या अशी नोटीस तुमच्या स्क्रीनवर पॉप-अप होईल.
8.जर आपल्या नावावर एकच पॅनकार्ड रजिस्टर केले असल्यास त्याची सविस्तर माहिती आपल्या स्क्रीनवर दिसेल.

अभिप्राय द्या!