कर नियोजानासाठी SIP हा उत्कृष्ठ पर्याय समाजाला जातो
इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीम (ईएलएसएस) : म्युच्युअल फंडांकडून सुरु असलेल्या या योजनेमध्ये गुंतवणूक ही किमान ३ वर्षांसाठी असली पाहिजे. कलम ८० सी अंतर्गत जे इतर गुंतवणूक पर्याय आहेत त्यामध्ये ‘ईएलएसएस’चा आवश्यक गुंतवणूक कालावधी सर्वात कमी आहे. मुदत ठेवींमध्ये किमान ५ वर्षे, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रे (एनएससी) साठी १० वर्षांपर्यंत गुंतवणूक धारण करावी लागते. ईएलएसएसमधील गुंतवणुकीत शेअर बाजारातील गुंतवणुकीसारखी वृद्धी क्षमता आहे. इतर गुंतवणुकीच्या पर्यायात वाढ होत नाही. ईएलएसएसवर मिळणारा लाभांश करमुक्त आहे. तीन वर्षांनंतर ईएलएसएसमधील गुंतवणूक विकली तर त्यावर झालेल्या भांडवली नफ्यावर कर भरावा लागत नाही. कारण ईएलएसएसच्या विक्रीवर शेअर उलाढाल कर (एसटीटी) भरलेला असल्यामुळे तो करमुक्त आहे. या सर्वामुळे ईएलएसएसमध्ये एसआयपी (सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लान) करणे सोयीस्कर ठरते.
तसेच ज्यांना मुली आहेत त्यांनी सुकन्या समृद्धी या योजनेद्वारे कर नियोजन करावे असा सल्ला आहे !!
सुकन्या समृद्धी खाते : या योजनेंतर्गत १८ वर्षांखालील मुलीच्या नावाने खाते उघडून त्यामध्ये जमा केलेल्या रकमेची दीड लाख रुपयांपर्यंत वजावट मिळते. या खात्यात किमान १,००० रुपये आणि जास्तीत जास्त दीड लाख रुपये एका वर्षांत जमा करता येतात. यावर मिळणारे व्याज करमुक्त आहे. हे खाते फक्त दोन मुलींच्या नावाने उघडता येते. जर तीन मुली असतील त्यातील एक जुळे असेल तर तिन्ही मुलींच्या नावाने खाते उघडता येते. या खात्यात १५ वर्षे पैसे जमा करता येतात. हे खाते २१ वर्षांपर्यंत किंवा मुलीच्या विवाहापर्यंत चालू राहते.