पैश्याकडेच पैसा जातो ! खूप पैसे मिळवून काय करायचे ?
असे म्हणत ” कोल्ह्याला द्राक्षे आंबट ” या वृत्तीने श्रीमंतीकडे पाहत स्वतःच्या परिस्थितीमुळे निराश विचार करत व उदास जीवन जगणार्यांनी आपल्या विचारात व आचरणात थोडा बदल केला तर मध्यमवर्गीयसुद्धा स्वतःची आर्थिक स्थिती बदलू शकतात आणि आर्थिक स्थैर्य सुद्धा प्राप्त करू शकतात.
पण यासाठी कठोर आर्थिक शिस्त अंगी आणणे महत्वाचे आहे . व या शिस्तीची अत्यंत सोपी दहा तंत्रे वाचकांना धनलाभ तर्फे सांगण्यात येत आहेत.
- दरमहा पगाररुपी FIX उत्पन्न हातात येत असल्याने कोणतीही किमती व मौल्यवान गोष्ट खरेदीसाठी नोकरदार मंडळी EMI चा पर्याय स्वीकारतात व १२% चक्रवाढ व्याजाचा किडा आपल्या उत्पन्नाला लावून घेतात त्यामुळे उत्पन्न वाढच थांबते.
- उत्पन्नातून होणारा खर्च केल्यावर राहील तीच बचत ही वृत्ती अंगी ठेवल्याने ” गुंतवणूक होतच नाही . आणि हे टाळण्यासाठी गुंतवणुकीचे लक्ष्य ठरवून उर्वरित रक्कमच खर्चासाठी वापरण्याचा निर्णय घेवून वागणे हितावह आहे !!
- कुठलीही वस्तू खरेदी करताना तिची किंमत , उपयुक्तता व टिकावूपणा याचा विचार करावा व मगच खरेदीचा निर्णय घ्यावा.
- online shoping , क्रेडीट कार्ड वापरून EMI आधारीत shoping टाळणे हितावह आहे !!
- मिळकतीत कशी वाढ होऊ शकते याचा विचार होणे व त्यादृष्टीने प्रयत्नशील राहणे हितावह आहे .STITCH IN TIME -SAVES NINE हा मंत्रसुद्धा आत्मसावा !
- pocketmoney चा वापर मुले कसाही करताना दिसतात , यासाठी 100 रुपये मिळविण्यासाठी किती कष्ट पडतात याची जाणीव पालकांनी आपल्या मुलांना करुन देणे हितावह आहे.
- गुंतवणूक म्हणून अनेक विमा policy घेण्यापेक्षा मेडिक्लेम , व term plan चा विचार करावा व यासाठी सल्लागार गाठणे हितावह !!
- कुटुंबातील सदस्यांना आपली ऐपत सांगावी !!
- मुलानाही बचतीची सवय लावावी !
- आणि सर्वात महत्वाचे म्हणजे ध्येय ठरवून SIP चा पर्याय स्वीकारावा.
तुमचे गुंतवणूकीचे विविध सल्ले वारंवार वाचून आमचा पारंपारीक गंतवणूकीचा विचार आता बदलून नव नविन क्षेत्रात वाटचाल सुरु झाली.Thank u very much.
Thanks a lot !!