शेअर बाजारात देखील लवकरच नवीन शेअर्स खरेदी करण्यासाठी आणि म्युच्युअल फंड खरेदीसाठी आधार कार्ड बंधनकारक केले जाण्याची शक्यता आहे. केंद्रातील मोदी सरकार आणि शेअर बाजार नियामक मंडळ ‘सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया’ अर्थात सेबी आधार कार्डला शेअर बाजारातील व्यवहाराला जोडण्याचा विचार करत आहे. त्यामुळे काळा पैसा शेअर बाजारात येण्याला चाप बसणार आहे.

केंद्र सरकार आता विविध सेवांसोबत आधारकार्ड जोडणी बंधनकारक करत आहे. आता आणखी एक पाऊल पुढे टाकत शेअर बाजारातील व्यवहारांशी देखील आधार जोडणीसाठी सरकारने हालचाली सुरू केल्या आहेत. सध्या शेअर बाजारात व्यवहार करताना किंवा नवीन म्युच्युअल फंडांची खरेदी करण्यासाठी आधार कार्डची आवश्यकता भासत नाही. हे सर्व व्यवहार सध्या पॅन कार्डच्या साहाय्याने होतात.

अभिप्राय द्या!

Close Menu