नियमित कर्ज भरणाऱ्या गृह कर्जदारांना तब्बल १२ मासिक हप्ते माफ करणारी योजना खासगी क्षेत्रातील आघाडीच्या अ‍ॅक्सिस बँकेने सादर केली आहे. मात्र त्यासाठी ३० लाख रुपयेपर्यंत व २० वर्षे कालावधीसाठी कर्ज घेतलेले असावे. या योजनेचा लाभ घेण्याकरिता कर्जदारांना कर्जाचा एकही हप्ता चुकविता येणार नाही.

वार्षिक ८.३५ टक्के गृह कर्ज असलेल्या या योजनेमुळे गृह कर्जदारांचे मुद्दल आणि व्याज असे धरून ३ लाख रुपये या कालावधीत बचत होणार आहेत. २० वर्षांच्या कर्ज कालावधीत चौथ्या, आठव्या आणि १२ व्या वर्षांत कर्जदाराचे प्रत्येकी चार हप्ते माफ केले जाणार आहेत.

तसेच स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) कार, सोने आणि वैयक्तिक कर्ज यावरील प्रक्रिया शुल्कात 100 टक्क्यांपर्यंत सवलत देत असल्याचे आज जाहीर केले आहे. महाराष्ट्र आणि गोव्यातील ग्राहकांसाठी 30 सप्टेंबर 2017पर्यंत गृह कर्जवरील प्रक्रिया शुल्क माफ करण्यात आले आहे. या सवलतीत सध्याच्या `टेकओव्हर ऑफ होम लोन्स’वरील प्रक्रिया शुल्कावरील सवलत अतिरिक्त धरली जाईल.

अभिप्राय द्या!