योग्यप्रकारे आर्थिक नियोजन कसे कराल?

सर्वसामान्य कुटुंबप्रमुखाने आपल्या आर्थिक जबाबदाऱ्या वेळीच ओळखून खाली दिल्यानुसार नियोजन केल्यास कोणताही ताणतणाव न येता हसत खेळत  आर्थिक नियोजन योग्य प्रकारे होऊ शकते.

  • आपल्या महिन्याच्या एकूण उत्पन्नापैकी  जास्तीतजास्त ३०%च रक्कम ही घरखर्चासाठी वापरली गेली पाहिजे.

 

  • ३०% रक्कम ही बँक कर्ज, देणी ई. साठी ठेवावी.

 

  • ३०% रक्कम ही भविष्य नियोजनासाठी बचत केली पाहिजे.

 

  • उरलेले फक्त १०% रक्कम ही आपल्या मानोरंजनासाठी वापरली जायला हवी.

 

  • कमीतकमी पुढील ६ महिन्यांचा घर- ऑफिस खर्चाची तरतूद अगोदरच असायला हवी, जेणेकरून नोकरी गेली, किंवा व्यवसायात मंदी आली तरी ही त्यावर ६ महिने पुढील सोय होईस्तोवर आपले खर्च चालतील.

 

  • सेकंड होम ही इंवेस्टमेंट नाही, सर्व्हे असे दर्शवतो की सेकंड होम हे एकूण व्याज आणि खर्च, आणि वाढती महागाई वगळून जास्तीतजास्त ५% फायदा करून देऊ शकते.

 

  • ४५ वयानंतर कुठली ही देणी, कर्ज आपल्या अंगावर असू नयेत. मुलांचे उच्चशिक्षण, लग्न ही या काळात होतात त्याचे प्लानिंग आपल्या ३० वयापासून व्हायला हवेत.

 

  • बँकेत पती-पत्नीचे जॉईन्ट अकौंट असणे अनिवार्य आहे.

 

  • आपली प्रॉपर्टी ही पती-पत्नी दोघांच्या नावे हवी, कारण as per legal act पतीच्या मृत्यू नंतर पत्नी वारसदार असते आणि नंतर मुले.

 

  • टर्म इन्शुरन्स असणेही गरजेचे आहे, हेच पुढे तुमच्या कुटुंबाला संरक्षण देते.

 

  • कुठल्याही इन्व्हेस्टमेंटचे निर्णय हे भावनिक दृष्टीकोनातून घेऊ नये.

 

  • मेडिक्लेम हा अत्यंत गरजेचा आहे.

 

  • जर बँकेत चोरी किंवा आग लागल्यास आपल्या बँकेतील लॉकरवर फक्त १ लाख पर्यंत रक्कम बँक रिटर्न म्हणून देऊ शकते, उरलेले नुकसान आपले असते.

 

This Post Has 2 Comments

    1. Pradeep Joshi

      धन्यवाद

अभिप्राय द्या!