बचत खात्याऐवजी म्युच्युअल फंडाचे लिक्विड फंड अधिक परतावा देणारे व सोयीचे आहेत. प्रत्येक फंड घराण्याच्या किमान एका फंडाला इन्स्टंट रिडम्प्शन सुविधा देणे ‘सेबी’ने सक्तीचे केले आहे. त्यामुळे ही गुंतवणूक खूप छानच आहे. इतकी त्यातून पैसा काढून घ्यायचे म्हटले तर अगदी पुढील १५ मिनिटांत बँक खात्यात पैसा जमाही झालेला दिसून येईल. लिक्विड फंड हे आधुनिक युगातील बचत खाते असून एका टिचकीवर गुंतवणूक करणे व लिक्विड फंडातून पैसे काढून घेणे शक्य झाले आहे. ज्या म्युच्युअल फंडाची मोबाईल अ‍ॅप आहेत त्या म्युच्युअल फंडांत मोबाईलचा वापर करून गुंतवणूक करणे शक्य आहे.

बँकांच्या ठेवींवर मिळणाऱ्या व्याजावर उगमस्थानीच कर (टीडीएस) कापला जातो तर बँकेच्या मुदत ठेवींऐवजी रोखे गुंतवणूक करणाऱ्या (डेट) म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणे कधीही करकपातीच्या दृष्टीने कार्यक्षम असते. रोखे गुंतवणूक करणाऱ्या म्युच्युअल फंडातील गुंतवणुक ३ वर्षे काढून घेतली नाही तर  झालेला भांडवली नफा इंडेक्सेशनसाठी पात्र ठरतो. त्याआधी गुंतवणूक काढून घेतली तर  (शॉर्ट टर्म कॅपिटल गेन भरावा लागतो. बँकेच्या मुदत ठेवी मुदतपूर्व काढून घेतल्यास विहित व्याजापेक्षा कमी व्याज तर मिळते. शिवाय बँका ठेव मुदतपूर्व काढून घेतल्याबद्दल दंड  सुद्धा आकारतात. त्याउलट म्युच्युअल फंडांचे डेट फंड हे बाजार संलग्न परतावा देतात. महागाईचा दर कमी झाला तर आनंदाने उसळी मारतात . देशातील सर्वात मोठा रोखे विक्रेता भारत सरकार आहे त्या खालोखाल विविध राज्ये आपल्या खर्चासाठी रोखे विकून निधी उभारत असतात. या रोख्यांवर रिझव्‍‌र्ह बँकेचे संपूर्ण नियंत्रण असते. पर्यायाने केंद्र सरकारने वेळेवर व्याज आणि मुदतपूर्तीनंतर मुद्दल देण्याची हमी दिलेली असते. केंद्र व राज्य सरकारच्या रोख्यांच्या व्यवहारावर रिझव्‍‌र्ह बँकेच्या पब्लिक डेट ऑफिसचे नियंत्रण असते. महागाईच्या दराहून अधिक परतावा मिळवायचा तर रोखे व समभाग यांचा मिलाफ साधायला हवा. अशा गुंतवणुकीतून बचतीची वृद्धी आणि स्थैर्य यांचे संतुलन  साधता येते. वित्तीय नियोजनात समभाग व रोखे यांचे प्रमाण किती असावे याचा ढोबळ अंदाज वित्तानियोजक सांगतो.

समभाग गुंतवणुकीसाठी म्युच्युअल फंड एक आदर्श पर्याय आहे. त्यातही -सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लान – एसआयपी अवलंब केल्यास दरमहा लहान रकमेच्या गुंतवणूकीतून मोठी वित्तीय ध्येये गाठता येतात. सेवानिवृत्ती, मुलांची शिक्षणे, अशक्य वाटणारी तरी जोपासलेली स्वप्ने, राहून गेलेले छंद यासाठी मोठी रक्कम जमवण्याचे सामर्थ्य समभाग गुंतवणुकीत आहे. मुद्दल गमावण्याच्या धोक्यापेक्षा महागाईमुळे बचतीची क्रयशक्ती कमी होण्याचा धोका अधिक गंभीर आहे. म्हणून महागाईच्या दराहून अधिक परतावा मिळाला तरच बचत फायदेशीर होते.

आणि यासाठी आपण या गणेशचतुर्थीच्या सुमुहूर्तावर एक तरी SIP सुरु करावी ही धनलाभ च्या वाचकांना विनंती आहे .

अभिप्राय द्या!