BSE या सर्वात जुन्या exchange ने म्युच्युअल फंड खरेदीसाठी STAR MF ही सुविधा सिंधुदुर्ग जिल्ह्यातही सुरु केली असून त्याद्वारे म्युच्युअल फंडाची युनिट्स डिमॅट स्वरूपातठेवता येऊ शकतात !!

त्याचे फायदे पहा !!

१. एकाच डिमॅट खात्यात शेअर्स व म्युच्युअल फंड युनिट्सचे विवरण बघण्याची सोय.

२. आपले नामनिर्देशन, बँक खात्यातील बदल, पत्ता/जागा बदलण्याचा दाखला आपण फक्त एका ठिकाणी म्हणजे डिपीला पत्र देऊन बदलू शकतो. सध्या असे करायचे तर आपणास जेवढय़ा म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक आहे, त्या सर्व फंड घराणे/ एएमसींना वेगवेगळे पत्र द्यावे लागते.

३. नवीन युनिट्स घेण्यासाठी आपण आपल्या ब्रोकरला फोन करून ती खरेदी करू शकता आणि जसे शेअर्स जमा होतात, त्याचप्रमाणे ही युनिट्स तुमच्या डिमॅट खात्यात जमा होतील.

४. सिस्टीमेटिक इन्वेस्टमेंट प्लान (एसआयपी ) डिमॅट स्वरूपात चालू करू शकता.

५. म्युच्युअल फंडाच्या नवीन योजनेमध्ये आपले डिमॅट खाते क्रमांक घालून सहभागी होऊ शकता.

६. आपल्या खात्यातील डिमॅट स्वरूपातील सर्व युनिट्स विकण्याची किंवा थोडी युनिट्स विकण्याची सोय.

७. आपल्या म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीचा लाभांश इच्छित बँक खात्यात इलेक्ट्रॉनिक पद्धतीने थेट मिळण्याची सोय.

८. डिमॅट स्वरूपातील एकत्रित युनिट्सवर कर्ज घेण्याची सुविधा

९. डिपॉझिटरीकडून म्युच्युअल फंड युनिट्स घेतले किंवा विकले यासंबंधी पावती मिळण्याची सुविधा.

म्युच्युअल फंडाची युनिट्स डिमॅट स्वरूपात ठेवण्यासंबंधी असलेले गैरसमज

१. डिमॅट खात्याचे चार्जेस (वार्षिक खाते शुल्क) भरावे लागतील.

२. युनिट्स विकताना गुंतवणूकदारांना ब्रोकरेज द्यावे लागेल. परंतु बरेचसे डिपी अशा प्रकारचे शुल्क आकारत नसून गुंतवणूकदारांनी या प्रक्रियेचा फायदा घ्यायला हवा.

हल्लीच म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीने २० लाख कोटींचा टप्पा पार केल्याची माहिती आपण वाचली असेलच. या गुंतवणुकीमधील किरकोळ गुंतवणूकदारांचे प्रमाण हे मोठय़ा वेगाने वाढत आहे. आणि ही गुंतवणूक जर डिमॅट स्वरूपात झाल्यास गुंतवणूकदारांना उपरोक्त फायदे घेता येतील तसेच आगामी काळात बरेचसे ब्रोकर्स /डिपी या सुविधा डिमॅट स्वरूपातच द्यायची योजना आखत आहेत तेव्हा काळाप्रमाणे बदल करणे सर्वानाच सोयीस्कर होणार आहे.

यादृष्टीने BSE STAR MF हा platform अत्यंत उपयुक्त ठरणारा आहे !!

अभिप्राय द्या!