निर्देशांक उच्च पातळीवर असतांना गुंतवणूकदार नवीन गुंतवणूक करण्यास घाबरतात. अशा  गुंतवणूकदारांना बाजार नजीकच्या काळात घसरेल आणि घसरलेल्या बाजारात मी नवीन गुंतवणूक करेन असे सारखे वाटते.मात्र प्रत्यक्षात हा गुंतवणूकदार एका  तेजीला मुकतो. बाजारात गुंतवणुकीचा कोणीच मौका साधू शकलेले नाही. बाजारात गुंतवणुकीची वेळ साधण्याचे उत्तम धोरण म्हणजे एसआयपी किंवा नियोजनबद्ध गुंतवणुकीच्या मार्गाने गुंतवणूक करणे. बाजारातील चढ उतारांना सामोरे जाण्यासाठी एसआयपी सारखे दुसरे प्रभावी साधन नाही. एसआयपी केवळ गुंतवणुकीची संधी साधण्यासाठी नसून गुंतवणूक करण्याचा एस शिस्तबद्ध मार्ग आहे.

गुंतवणुकीचा निर्णय न घेणे किंवा म्युच्युअल फंडात गुंतवणूक करायचे टाळणे या सारखी चूक असू शकत नाही. गुंतवणुकीचा निर्णय रहित करणे म्हणजे चक्रवाढ व्याज या संकल्पानेकडे डोळे झाक करणे होय. गुंतवणुकीचा निर्णय ५ वर्षांसाठी रहित करणे म्हणजे एकूण गुंतवणूक कालावधी कमी झाल्यामुळे ४५ ते ५० टक्के कमी रक्कम उद्दिष्टपूर्तीवेळी मिळणे होय.

अनेक वर्षांच्या संशोधनाअंती असे सिद्ध झाले आहे की, गुंतवणूकदार म्युच्युअल फंड निवडताना त्याच चुका पुन्हा करतात. गुंतवणूकदरांनी या चुका टाळल्या तर परताव्याचा दर वाढेल व गुंतवणूक करण्याचा पूर्ण फायदा घेता येईल. यासाठी sip चा पर्याय सर्वोत्तम होय !!

अभिप्राय द्या!