म्युच्युअल फंड उद्योग आपली संपूर्ण प्रणाली अधिक कार्यक्षम व विनासायास बनविण्यासाठी तंत्रज्ञानाच्या भूमिकेबद्दल अधिकाधिक सजग बनला आहे.अचूक व अत्यंत सोप्या पद्धतिचे व्यवहार हा मूलमंत्र सर्वच म्युच्युअल फंडानी ग्राहकांना जवळजवळ विनामोबदला देवू केला आहे. आणि यावर BSE STAR MF या platform वरून तर सर्वच व्यवहार हे पेपरलेस झाले आहेत !!

  • व्यवहार सुलभता : जलद, कार्यक्षम आणि कागदरहित व्यवहार सक्षम करण्यासाठी, म्युच्युअल फंड उद्योगाने  फोलिओ निर्मिती अत्यंत सुलभ केली आहे . वैध कागदपत्रे असलेल्या ऑनलाइन बँकिंग सुविधेचा उपयोग करणारा एखादा गुंतवणूकदार अगदी काही मिनिटांमध्ये म्युच्युअल फंडात व्यवहार करू शकतो. हे व्यवहार संकेतस्थळ किंवा मोबाइलचा वापर करून केले जाऊ  शकतात.
  •  गुंतवणूकदारांना त्यांच्या स्मार्टफोनचा वापर करून म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यास मदत करणाऱ्या अ‍ॅप्लिकेशन्सचा सध्या वित्तीय बाजारपेठेत मोठा शिरकाव झाला आहे. या नवप्रयोगांनी केवळ व्यवहार सक्षम केले नाहीत, तर गुंतवणूकदारांना मालमत्ता विभाजन आणि त्यांच्या पोर्टफोलिओचे मूल्य याबाबतही माहिती प्रदान केली आहे. याशिवाय गुंतवणूकदार आपल्या उलाढालींचा मागोवा आणि ई-मेलद्वारे  खाते विवरण मिळवू शकतात. लक्ष्य-आधारित गुंतवणुकीला मदत करण्यासाठी या अ‍ॅप्लिकेशनमध्ये विविध गुंतवणूक पर्याय आणि  कॅलक्युलेटरचा अंतर्भाव केला आहे .  अनेक फंड घराण्यांनी आपल्या मोबाइल अ‍ॅपमध्ये गुंतवणुकदारांना त्वरित रोख रकमेची आवश्यकता लक्षात घेऊन इन्स्टंट रिडम्प्शनची सोय केली आहे.
  •  काही फंड घराण्यांकडून गुंतवणूकदारांना एसएमएस-आधारित गुंतवणुकीचा पर्याय खुला केला गेला आहे. एसएमएस-आधारित म्युच्युअल फंड गुंतवणुकीची प्रक्रिया सोपी आहे आणि विशेष म्हणजे वापरकर्त्यांकडे स्मार्टफोन किंवा वेगवान इंटरनेट जोडणी असणे आवश्यक नाही.
  • ग्राहकांना  प्रभावित करण्यासाठी तसेच शिक्षित करण्याचे एक साधन म्हणून  ग्राफिक्स इंटरचेंजेबल फॉरमॅटचा वापर चपखलपणे केला जात आहे. या सर्वांचा अनुभव घेण्यासाठी एकवेळ चोखंदळ ग्राहकाने शेअरखान सावंतवाडी या कार्यालयाला भेट देवून पहावी असे आवाहन धनलाभ तर्फे करण्यात येत आहे !!

अभिप्राय द्या!