SIP खंडित झाल्यास

तुमच्या बँक खात्यात पुरेशी रक्कम नसेल तर एसआयपीसाठी बँकेला म्युच्युअल फंडाकडून करण्यात आलेली विनंती बँकेकडून नाकारली जाईल आणि त्या महिन्यातील तुमची एसआयपी पूर्ण होणार नाही. एसआयपी रद्द झाली किंवा पैसे भरले गेले नाहीत म्हणून संबंधित फंड हाउसकडून कोणताही दंड आकारला जात नाही. मात्र, तुमच्या बँकेकडून ईसीएस (इलेक्ट्रॉनिक क्लिअरिंग सिस्टिम) चुकल्याबद्दल तुम्हाला दंड आकारला जाईल. हा दंड प्रत्येक बँकेनुसार बदलता असतो. तुमची एसआयपी सुरूच राहील आणि पुढच्या महिन्यात पुन्हा एकदा बँकेकडे म्युच्युअल फंडाकडून विनंती केली जाईल. एकामागून एक असा तीन एसआयपी चुकल्यासच फंडाकडून बँकेला एसआयपीसाठी विनंती करणे बंद होईल आणि त्यानंतर तुमची एसआयपी बंद होईल.

काही फंड घराण्यांनी तीन SIP चुकल्या तरीही SIP बंद करण्याचा निर्णय घेणे थांबविले  आहे !!

आपण SIP भरणे थांबविल्यास

एसआयपीच्या माध्यमातून जमा  झालेली  रक्कम त्या म्युच्युअल फंडात पडून राहिल. समजा, तुम्ही दोन हजार रुपये महिना अशी एसआयपी काढली आहे, १५ हप्ते नियमित भरले आहेत आणि त्यानंतर एसआयपी खंडित झाली आहे. अशा स्थितीत तुमची ३० हजार रुपये जमा गुंतवणूक म्युच्युअल फंड गुंतलेलीच राहील आणि तुम्ही ही रक्कम काढेपर्यंत त्या योजनेचे सर्व लाभ या ३० हजारांवरही मिळत राहतील. एसआयपी बंदी केल्यास संबंधित म्युच्युअल फंडाकडून कोणताही दंड आकारला जाणार नाही. फंडाच्या एग्झिट लोड नियम पाहून तुम्ही हे पैसे काढूनही घेऊ शकता.

काही अपरिहार्य कारणांमुळे तुम्हाला एसआयपी भरणे शक्य नसल्यास तुम्ही ‘पॉझ एसआयपी’ सुविधेचा वापर करू शकता. अशी सुविधा काही म्युच्युअल फंड देतात. या सुविधेअंतर्गत काही काळासाठी तुम्ही एसआयपी थांबवू शकता. त्यानंतर एसआयपी आपोआप सुरू होते. एसआयपी ऑनलाइन बंद करण्यासाठी पाच ते सात दिवस लागतात, तर ऑफलाइन बंद करण्यासाठी २१ दिवसांपर्यंत कालावधी लागू शकतो.

SIP चुकू नये

यासाठी म्युच्युअल फंडाकडे आपला मोबाइल क्रमांक व ईमेल नोंदवावा. यामुळे म्युच्युअल फंडाकडून तुम्हाला एसआयपीच्या तारखेच्या आधी काही दिवस अॅलर्ट येईल. प्रत्यक्ष एसआयपीचा व्यवहार पूर्ण झाल्यावरही तुम्हाला मेसेज किंवा ईमेल येईल.

या सर्व सोयीपायी SIP चुकल्यास / खंडित झाल्यास आपल्याला काहीही नुकसान होत नाही हे सर्वांनी ध्यानी घ्यावे.

 

अभिप्राय द्या!

Close Menu