जर का तुम्ही अभ्यास केलात तर तुम्हाला दिसून येईल कि फार्मा सेक्टर मधील जवळपास सर्वच शेअर्सच्या किंमती या त्यांच्या उच्चतम पातळीच्या तुलतेन जवळपास ४०% झालेल्या आहेत.  हीच ती वेळ आहे या सेक्टरमधील शेअर्स असणाऱ्या म्युचुअल फंड योजनेत गुंतवणूक करण्याची. जर का तुमची ३ ते ४ वर्षे वाट पाहण्याची तयारी असेल तर तुम्ही SBI Pharma Fund, Reliance Pharma Fund or UTI Pharma & Healthcare Fund यापैकी कोणत्याही योजनेत किंवा तिन्ही योजनेत एकरकमी गुंतवणूक करू शकता.

माझ्या मते पुढील ३ ते ४ वर्षात तुम्ही गुंतवलेल्या पैशाचे मूल्य दुप्पट किंवा अगदी तिप्पट सुद्धा होऊ शकेल. मात्र अल्प काळात गुंतवणुकीचे मूल्य कमी सुद्धा होऊ शकते. सध्या ह्या सेक्टरमध्ये निगेटिव्ह ट्रेंड आहे, यु.एस. एफ.डी.ए. ने काही ऑब्जेक्शन्स काढलेली असल्यामुळे फार्मा सेक्टरमधील शेअर्सच्या किंमती कमी झालेल्या आहेत. जेव्हा हा प्रॉब्लेम सुटेल तेव्हा या क्षेत्रातील कंपन्यांचे शेअर्सचे भाव वाढू लागतील.

मागील इतिहास असे सूचित करतो कि फार्मा फंड्स मधून सलग तीन वर्षे ४० ते ४५% वार्षिक चक्रवाढ दराने परतावे मिळाले कि कोणत्या न कोणत्या कारणाने या क्षेत्रातील कंपन्यांचे भाव कमी होतात व नंतर १-२ वर्षे वाईट जातात व मग परत तेजी येऊन परत पुढील ३-४ वर्षात उत्तम परतावा मिळतो. शेअरबाजाराचे एक सूत्र आहे जेव्हा मंदी असते तेव्हा खरेदी करा व तेजीत विकून टाका.

हे एक त्रिकालाबाधित सत्य आहे कि फक्त शेअर बाजार किंवा म्युचुअल फंडातूनच सर्वाधिक फायदा मिळतो, गरज असते ते फक्त संयमाची, दीर्घ काळ नियमितपणे गुंतवणूक करत राहण्याची.

 

तुम्हाला जर SBI Pharma Fund, Reliance Pharma Fund or UTI Pharma & Healthcare Fund या पैकी कोणत्याही किंवा तिन्ही फंडात गुंतवणूक करावयाची असेल तर शेरखान सावंतवाडीशी संपर्क साधा

 

वैधानिक इशारा:

म्युचुअल फंडातील गुंतवणूक हि बाजाराच्या अधीन असते. गुंतवणूक करण्यापूर्वी योजनेचे ऑफर डाक्युमेंट वाचून घ्या व मग गुंतवणूक करा.

अभिप्राय द्या!