विमा क्षेत्रातील चार कंपन्यांनी आयपीओ आणण्याची जोरदार तयारी सुरू केली आहे. एचडीएफसी स्टॅंडर्ड लाईफच्या आयपीओ प्रस्तावाला सेबीने परवानगी दिली असून लवकरच कंपनीकडून घोषणा केली जाईल. त्याशिवाय सरकारी विमा कंपन्या असलेल्या न्यू इंडिया ऍश्‍युरन्स आणि जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (जीआसी) या दोन कंपन्यांचे आयपीओ याच वर्षात बाजारात धडकणार आहेत. दोन्ही कंपन्यांकडून 20 हजार कोटींचा निधी उभारला जाईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. एसबीआय लाईफ इन्शुरन्सने आयपीओ प्रस्ताव सेबीकडे पाठवला असून त्यांनाही परवानगी मिळण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांसाठी येत्या काही महिन्यात विमा कंपन्यांमधील गुंतवणुकीची संधी उपलब्ध होणार आहे.

अभिप्राय द्या!

Close Menu