“धनलाभ” हे संकेतस्थळ सरू झाल्यापासून संपादकीयमधून म्युच्युअल फंडासंदर्भात खरेदी संदर्भातील अनेक पध्दतीची माहिती प्रसिद्ध केली आहे.
वाचक या माहितीचा लाभ घेऊन स्वतःचा फायदा कोणत्या फंडामधून होऊ शकतो हेही अजमावताना दिसत आहे .
आज कोणत्या फंडाद्वारे नव्याने गुंतवणूक सुरु करावी यासाठी काही चांगले फंड सुचविण्याचा मानस आहे.
शेअरबाजारने आज सर्वोच्च पातळी गाठलेली असताना या सर्व फंडामध्ये SIP किंवा STP करणे हे सुज्ञपणाचे लक्षण होऊ शकेल हे मात्र नक्की !!
फंडाचे नाव
- IDFC Sterling Equity Fund (Growth) या फंडाची गुंतवणूक लीडर्स व चॅलेंजर्स समभागामध्ये आहे.
- LIC Mutual Fund Midcap Fund या फंडाची मालमत्ता सध्या २०० ते ३०० कोटी रुपयांची असली तरी गेल्या एका वर्षातील याचा परतावा २८% आहे!
- UTI Mastershear क्रिकेट मधील ‘राहुल द्रविड’ म्हणता येईल असं हा फंड आहे.
- UTI Balanced Fund (Growth) गेल्याच आठवड्यात या फंडाचे फंडमॅनेजर “श्रीवत्स” यांची गोवा येथे एका कार्यक्रमादरम्यान भेट झाली. या फंडाची मालमत्ता ५००० कोटी पेक्षा जास्त असून गेल्या दीड वर्षात या फंडाने १७% पेक्षा जास्त परतावा दिला आहे.
- L&T Tax Advantage Fund
- DSP Blackrock Balanced Fund
- IDFC Balanced Fund
- Mira Asset India Opportunity Fund
- Kotak Emerging Equity Fund
- ICICI Prudential Focused Blue Chip Fund
- Birla Sunlife Equity Fund
- UTI Blue Chip Flexicap Fund
वरील सर्व फंड हे इक्विटी लिंक फंड असल्याने गुंतवणूक करण्यापूर्वी सर्व कागदपत्रे पाहणे महत्वाचे असून आपल्या सल्लागाराचा सल्लाही घ्यावा असेही सुचविण्यात येत आहे.